मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Tejashwi Ghosalkar Resigns : तेजस्वी घोसाळकर यांचा पदाचा राजीनामा…शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र…?

Uddhav Thackeray shock in Mumbai : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उत्तर मुंबईत मोठा धक्का बसला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Tejashwi Ghosalkar Resigns: Tejashwi Ghosalkar resigns from his post… Hail Maharashtra to Shiv Sena Thackeray group

 Uddhav Thackeray shock in Mumbai : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उत्तर मुंबईत मोठा धक्का बसला आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिला आहे.

मुंबई :- मुंबई महापालिकेतील माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर Tejashwi Ghosalkar Resigns यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सर्व पदांचा राजीनामा त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला. स्थानिक नेतृत्वावरील नाराजीतून राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं. त्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्या माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून, तर काही काळापूर्वी हत्या झालेले ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत.त्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे कुटुंबाशी जवळचे संबंध असलेल्या तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. स्थानिक नेतृत्वावर नाराज असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. यामुळे उत्तर मुंबईत ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली होती. त्यानंतर आता त्यांनी हा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शेअर करा