मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव यांच्या मराठीतून मनोगत, मुंबई पोलीस सह मुख्यमंत्री यांचेही मानले आभार

Suryakumar Yadav Marathi speech : सूर्यकुमार यादव यांनी सर्वांचे मानले आभार

V
Vivek

1 मिनिट वाचन

Rohit Sharma

Suryakumar Yadav Marathi speech : सूर्यकुमार यादव यांनी सर्वांचे मानले आभार

मुंबई :- विधान मंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये विश्व विजेते भारतीय संघाच्या मुंबईत असलेल्या खेळाडूंचे सरकारने अभिनंदन केले या कार्यक्रमात राज्याचे सर्व मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपसभापती, विधानसभा अध्यक्ष यावेळी उपस्थित होते. भारतीय संघाचे मुंबईत राहणारे रोहित शर्मा, Rohit Sharma सूर्यकुमार यादव, Suryakumar Yadav यशस्वी जयस्वाल, शुभम दुबे या चारी खेळाडूंचे राज्य सरकार मार्फत सत्कार करण्यात आले आहे.

छायाचित्रे · 1/5

Arrow Keys ⟵ ⟶

या कार्यक्रमात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी मराठीतून मनोगत व्यक्त करत जोरदार फटकेबाजी केली तर सूर्यकुमार यादव याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब धन्यवाद, तुम्ही आम्हाला ही संधी दिली. सर्वांना भेटून खूप चांगलं वाटत आहे. जे मी काल बघितलं ते मी कधी विसरु शकत नाही. तसेच मी इथेसुद्धा आज बघतोय, इथलेदेखील क्षण मी कधी विसरु शकत नाही. थँक्यू सो मच. मी काय म्हणू? माझे शब्द संपले आहेत. मला माहिती नाही, मला काय बोलायचं, थँक्यू सो मच”, अशा शब्दांत सूर्यकुमार यादव याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा: Rohit Sharma Felicitation Event: विधिमंडळात रोहित शर्मा यांची बॅटिंग, बरं झालं सूर्याच्या हातात कॅच बसला….

“इकडे येऊन खूप चांगले वाटले. आमचे बीसीसीआयचे ट्रेझर आशिष शेलार हे सुद्धा काल आम्हाला घ्यायला आले होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी जे काल बघितलं, आपल्या मुंबई पोलिसांनी जे काल केलंय, ते मला वाटत नाही की, कोणी असं करु शकतं. आम्हाला असंच प्रोत्साहन मिळेल, अशी आशा करतो. नंतर परत आपण अजून एक वर्ल्ड कप जिंकू”, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

हेही वाचा: Team India : रोहित शर्मासह इतर तीन खेळाडूंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, चॅम्पियन बनल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

शेअर करा