मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या घाईत का? शिंदे गटाच्या मंत्र्यांनी उपस्थित केले प्रश्न; 'लोकभावना पटलेली नाही'

•"कोणी करायला लावला हा शपथविधी?" उदय सामंत यांचा सवाल; तर 'लोकांना हे आवडलं नाही' म्हणत संजय शिरसाटांनी घरचा आहेर

V
Vivek

1 मिनिट वाचन

Baramati Lok Sabha Election : कन्हेरीच्या मारोती मंदिरात नाराळ फोडत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सुरुवात

•"कोणी करायला लावला हा शपथविधी?" उदय सामंत यांचा सवाल; तर 'लोकांना हे आवडलं नाही' म्हणत संजय शिरसाटांनी घरचा आहेर

मुंबई | अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, सुतकाच्या काळातच झालेल्या या शपथविधी सोहळ्यावर आता सत्ताधारी महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या (शिंदे गट) मंत्र्यांनीच जाहीर नाराजी आणि शंका व्यक्त केल्या आहेत. "इतक्या लवकर शपथविधी होणे सर्वसामान्य जनतेला रुचलेले नाही," अशी थेट भूमिका मंत्री संजय शिरसाट आणि उदय सामंत यांनी मांडली आहे.

उदय सामंत यांचा सवाल: "हे कोणी घडवून आणले?"

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना लोकांच्या मनातील शंका बोलून दाखवल्या. ते म्हणाले, "सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या याचे आम्हाला समाधानच आहे, त्या अजितदादांचा वारसा पुढे नेतील यात शंका नाही. मात्र, इतक्या लवकर शपथविधी करण्याची वेळ का आली? तो कोणी करायला लावला? सोशल मीडियावरील लोकांच्या कमेंट्स वाचल्या तर लक्षात येते की जनतेच्या मनात अनेक शंका आहेत. हे सर्व कोणी घडवून आणले आहे का? असे प्रश्न लोक विचारत आहेत."

संजय शिरसाट यांची 'जनभावना'

आमदार संजय शिरसाट यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेत म्हटले की, "एवढी मोठी दु:खद घटना घडल्यानंतर इतक्या घाईने शपथविधी होणे हे सामान्य माणसाला पटलेले नाही. मी केवळ जनभावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या विधानाने कोणाचा गैरसमज झाला असेल, तर त्याच्याशी मला देणंघेणं नाही. पण जे घडले ते लोकांना आवडलेले नाही, हे वास्तव आहे."

हेही वाचा: Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय! अजितदादांच्या निधनामुळे यंदा वाढदिवस साजरा करणार नाही

शेअर करा