मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : एसटी सवलतीसाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य; कार्ड मिळेपर्यंत क्यूआर कोडच्या पावतीचा आधार

Pune News : पुणे : एसटी महामंडळाच्या सामायिक गतिशीलता कार्ड (एनसीएमसी) योजनेअंतर्गत सवलतीचा लाभ घेण्यासाठी महिला आणि ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

एसटी सवलतीसाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य; कार्ड मिळेपर्यंत क्यूआर कोडच्या पावतीचा आधार
एसटी सवलतीसाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य; कार्ड मिळेपर्यंत क्यूआर कोडच्या पावतीचा आधार

Pune News : पुणे : एसटी महामंडळाच्या सामायिक गतिशीलता कार्ड (एनसीएमसी) योजनेअंतर्गत सवलतीचा लाभ घेण्यासाठी महिला आणि ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्ष स्मार्ट कार्ड मिळेपर्यंत प्रवाशांना क्यूआर कोड असलेल्या नोंदणी पावतीच्या आधारे ३० दिवस सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. त्यामुळे कार्ड मिळण्यास विलंब झाला, तरी पात्र प्रवाशांना सवलतीपासून वंचित राहावे लागणार नाही.https://epaper.maharashtramirror.comPune News

राज्य सरकारच्या योजनेनुसार, महिलांना तसेच ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिली जाते. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्डची नोंदणी करणे आवश्यक आहे. कार्डची नोंदणी आणि वितरण प्रक्रिया सुरू असून, प्रवाशांना ही सुविधा बसस्थानकांवरील नोंदणी केंद्रांवरही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कार्ड नोंदणीपासून प्रत्यक्ष स्मार्ट कार्ड मिळेपर्यंत सुमारे एक महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे महामंडळाने पर्यायी व्यवस्था केली आहे. नोंदणीच्या वेळी दिलेल्या पावतीवरील क्यूआर कोड एसटीच्या ई-तिकीट यंत्रावर स्कॅन केल्यानंतर नियमानुसार सवलतीचे तिकीट मिळू शकते. ही पावती नोंदणीच्या तारखेपासून केवळ ३० दिवस वैध असेल.

दरम्यान, ७५ वर्षे पूर्ण झालेल्या महिला आणि पुरुषांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत मोफत प्रवासाची सुविधा मिळते. या प्रवाशांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्डची सक्ती अद्याप लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या स्मार्ट कार्ड वापरण्याची अनिवार्यता महिला आणि ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांपुरतीच आहे.

पात्र प्रवाशांनी जवळच्या बसस्थानकावरील नोंदणी केंद्रात स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करावी आणि कार्ड मिळेपर्यंत क्यूआर कोड असलेली पावती जपून ठेवावी, असे आवाहन करण्यात येत आहे. कार्ड प्राप्त झाल्यानंतर ते सक्रिय करून आवश्यकतेनुसार रक्कम टॉप-अप करावी.

“एनसीएमसी स्मार्ट कार्ड मिळेपर्यंत पात्र प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी क्यूआर कोड असलेल्या पावतीवर ३० दिवस सवलतीचे तिकीट देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे प्रवाशांनी तातडीने कार्ड नोंदणी करून पावती जपून ठेवावी आणि निर्धारित मुदतीत स्मार्ट कार्ड सक्रिय करून घ्यावे. तसेच, पावतीवरील क्यूआर कोडचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून ठेवावा, जेणेकरून पावती जवळ नसल्यास तिच्या ऐवजी क्यूआर कोडचा वापर करता येईल,” अरुण सिया, नियंत्रक, एसटी महामंडळ, पुणे विभाग .

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा