मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Solapur Paper Leak News : सांगोल्यात चक्क स्ट्राँग रूम फोडून 10 वीचे पेपर चोरीला; उद्याच्या भूगोलाच्या परीक्षेवर टांगती तलवार!

Solapur Sangola Paper Leak News : सीसटीव्ही बंद आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; 50 प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याने शिक्षण वर्तुळात खळबळ

V
Vivek

1 मिनिट वाचन

Solapur Paper Leak News : सांगोल्यात चक्क स्ट्राँग रूम फोडून 10 वीचे पेपर चोरीला; उद्याच्या भूगोलाच्या परीक्षेवर टांगती तलवार!

Solapur Sangola Paper Leak News : सीसटीव्ही बंद आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; 50 प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याने शिक्षण वर्तुळात खळबळ

सांगोला (सोलापूर) :- राज्यात 10 वीच्या बोर्ड परीक्षा सुरू असतानाच सोलापूरच्या सांगोल्यातून एक अतिशय धक्कादायक आणि शिक्षण व्यवस्थेला हादरवणारी घटना समोर आली आहे. सांगोला शहरातील सांगोला विद्यामंदिर येथील बोर्ड परीक्षेची स्ट्राँग रूम फोडून चोरट्यांनी चक्क उद्या होणाऱ्या भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिका चोरून नेल्या आहेत. या धाडसी चोरीमुळे उद्याच्या परीक्षेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

असा उघडकीस आला प्रकार

मिळालेले माहितीनुसार, बोर्डाचे अधिकारी आणि कस्टडियन आज सकाळी कालचे उरलेले पेपर पोस्टात टाकण्यासाठी स्ट्राँग रूमजवळ आले होते. सकाळी 8.30 च्या सुमारास त्यांना स्ट्राँग रूमचे कुलूप कापलेल्या अवस्थेत दिसून आले. आत जाऊन पाहणी केली असता, उद्या होणाऱ्या भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिकांचे पाकीट फोडून त्यातील 50 पेपर चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.

सुरक्षेचा बोजवारा: सीसीटीव्ही बंद आणि पोलीस 'बेपत्ता'

या चोरीने पोलिसांच्या आणि शिक्षण विभागाच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढले आहेत:

सीसीटीव्ही बंद: ज्या स्ट्राँग रूममध्ये लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य असणारे पेपर ठेवले होते, त्या समोरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चोरट्यांचा कोणताही सुगावा पोलिसांना अद्याप लागलेला नाही.

सुरक्षारक्षक कुठे होता?: स्ट्राँग रूमच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेला पोलीस कर्मचारी चोरीच्या वेळी नेमका कुठे होता? असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी

घटनेचे गांभीर्य ओळखून सोलापूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर, डी. वाय. एस. पी. बसवराज शिवपुजे आणि स्थानिक पोलीस निरीक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. ठसेतज्ज्ञ आणि इतर तांत्रिक पथकांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

राज्यात आधीच 12 वीच्या परीक्षेत सामूहिक कॉपीचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. आता थेट स्ट्राँग रूममधून प्रश्नपत्रिकांची चोरी झाल्याने शिक्षण विभागाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. उद्याचा भूगोलाचा पेपर नियोजित वेळेत होणार की रद्द केला जाणार, याबाबत अद्याप बोर्डाकडून अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही.

शेअर करा