मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Shushilkumar Shinde | सोलापूर जिल्हा पुणे रहिवासी संघाच्यावतीने माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत कृष्णकुमार गोयल यांचा सत्कार

पुणे, दि, ३ जून, महाराष्ट्र मिरर

M
mubarak

1 मिनिट वाचन

Shushilkumar Shinde | सोलापूर जिल्हा पुणे रहिवासी संघाच्यावतीने माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत कृष्णकुमार गोयल यांचा सत्कार

पुणे, दि, ३ जून, महाराष्ट्र मिरर

कोहिनुर कट्टा तर्फे 'सामना' चित्रपटाला ५० वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हुल्लडबाज चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद चिंताजनक असल्याचे सूतोवाच केले.

कोहिनूर कट्ट्याच्या उद्घाटनानिमित्त राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात सोमवारी आयोजित कार्यक्रमाला ‘सामना’चे निर्माते रामदास फुटाणे, ‘मारुती कांबळेचं काय झालं’, या प्रश्नाभोवती सामना फिरविणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, कट्ट्याचे प्रमुख आणि उद्योजक कृष्णकुमार गोयल, ‘आशय फिल्म क्लब’चे सतीश जकातदार व दिग्दर्शक परेश मोकाशी उपस्थित होते. विजय तेंडुलकर, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू आणि भास्कर चंदावरकर यांच्या स्मरणार्थ पहिला ‌साहित्य कला गौरव सामना सन्मान‌ ‘वाळवी’च्या निर्मात्या मधुगंधा कुलकर्णी यांना सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला.

छायाचित्रे · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

यावेळी कोहिनुर कट्ट्याचे प्रमुख उद्योजक कृष्णकुमार गोयल यांचा सत्कार सोलापूर जिल्हा पुणे रहिवासी संघाच्यावतीने माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत मुस्ताक मोमीन यांनी केला. यावेळी संघाचे अदनान मोमीन, अल्ताफ मोमीन, इम्रान बाबूडे, महेबूब बाबूडे, महेबूब लांडगे, सकलेन पंजेशा शफिक मोमीन, अन्वर हन्नुरे उपस्थित होते.

हेही वाचा: Gopinath Munde : "नेतृत्व जिंकलं मनं, अपघातानं हरवलं तनं – गोपीनाथ मुंडेंची स्मृती अजर"

शेअर करा