मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Shrikant Shinde : संसदेत 'ऑपरेशन सिंदूर'वरून रणकंदन! श्रीकांत शिंदे विरोधकांवर संतापले, '50 खोके' घोषणांनी गदारोळ

Shrikant Shinde : "महापालिकेत नाही, संसदेत आहात, मॅच्युअर व्हा!" शिंदे यांचा विरोधकांना जोरदार टोला

V
Vivek

1 मिनिट वाचन

Kalyan, Thane Lok Sabha Live Update

Shrikant Shinde  : "महापालिकेत नाही, संसदेत आहात, मॅच्युअर व्हा!" शिंदे यांचा विरोधकांना जोरदार टोला

ANI :- संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. आज लोकसभेत शिवसेना (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या भाषणादरम्यान विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत गदारोळ केला, ज्यामुळे शिंदे चांगलेच संतापले.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर जोरदार घणाघात केला. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारवर केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. प्रणिती शिंदे यांनी सोमवारी संसदेत बोलताना 'ऑपरेशन सिंदूर हा केवळ सरकारचा तमाशा होता' असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावरूनही श्रीकांत शिंदे यांनी जोरदार टीका केली.

नेमकं काय घडलं?

श्रीकांत शिंदे आपल्या भाषणात एका कवितेच्या माध्यमातून 'ऑपरेशन सिंदूर'चे कौतुक करत होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैनिकांनी न्याय केला असून, यासाठी मी त्यांचे अभिनंदन करत आहे, असे ते म्हणाले. प्रत्येक देशवासीयांमध्ये देशभक्तीची ज्वाला आहे, असेही त्यांनी नमूद केले. मात्र, "तरीही विरोधक या ठिकाणी विचारत आहेत की दहशतवादी पहलगाममध्ये कसे आले? त्या दहशतवाद्यांचे पुढे काय झाले?" असे श्रीकांत शिंदे बोलत असताना विरोधी पक्षातील काही खासदारांनी अचानक '50 खोके एकदम ओके’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.

या घोषणाबाजीमुळे श्रीकांत शिंदे यांच्या भाषणात अडथळा निर्माण झाला आणि ते चांगलेच संतापले. त्यांनी विरोधकांना सुनावताना म्हटले की, "तुम्ही आता मॅच्युअर व्हा, त्यातून (50 खोके एकदम ओके या घोषणेतून) बाहेर या. तुम्ही आता सभागृहात आहात. देशाच्या संसदेत आलेला आहात. तुम्ही महापालिकेत नाहीत," अशा शब्दांत श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला. त्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी थांबवली.

शेअर करा