मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Shivsena : 'धनुष्यबाण' कोणाचा? शिवसेना पक्ष-चिन्ह वादावर आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

•2022 च्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटाचे आव्हान; आज ऐतिहासिक निकाल लागण्याची शक्यता

V
Vivek

1 मिनिट वाचन

Shivsena : 'धनुष्यबाण' कोणाचा? शिवसेना पक्ष-चिन्ह वादावर आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

•2022 च्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटाचे आव्हान; आज ऐतिहासिक निकाल लागण्याची शक्यता

मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' चिन्ह वादावर आज (बुधवार, 12 नोव्हेंबर 2025) सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीला सुरुवात होणार आहे. हा तीन वर्षांपासून प्रलंबित असलेला वाद आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.

प्रकरण काय आहे?

केंद्रीय निवडणूक आयोगाने 2022 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मूळ शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्याचा अधिकार दिला होता. आयोगाच्या या निर्णयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

आज काय होणार?

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची आज अंतिम सुनावणी होणार आहे. या महत्त्वपूर्ण सुनावणीनंतर न्यायालय याप्रकरणी आजच निकाल देऊ शकते किंवा दोन्ही बाजूंच्या वकिलांची सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवू शकते.

या निर्णयावर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे आणि दोन्ही शिवसेना गटांचे भविष्य अवलंबून असल्याने, आजची सुनावणी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

हेही वाचा: Vasai Crime News : वसईत 'स्टील' चोरीचा मेगा-प्लॅन उधळला! 40 लाखांचा मुद्देमाल जप्त करत 6 आंतरराज्यीय तस्कर जेरबंद

शेअर करा