मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Shivsena VS Ncp : दादा थोडे दिवस नसते आले तरी…. रामदास कदम यांची अजित पवार यांच्यावर टीका

Shivsena VS Ncp : शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी वर्धापनाच्या दिना दिवशी अजित पवार यांच्यावर टीका केली, आता अजित पवार गटाकडून रामदास कदम यांच्यावर टीका

V
Vivek

1 मिनिट वाचन

Shivsena VS Ncp : शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी वर्धापनाच्या दिना दिवशी अजित पवार यांच्यावर टीका केली, आता अजित पवार गटाकडून रामदास कदम यांच्यावर टीका

Shivsena VS Ncp : शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी वर्धापनाच्या दिना दिवशी अजित पवार यांच्यावर टीका केली, आता अजित पवार गटाकडून रामदास कदम यांच्यावर टीका

मुंबई :- शिवसेना पक्षाच्या 58 व्या वर्धापनदिनी मुंबई दोन मिळावे भरण्यात आले होते. वरळी येथे शिंदे गटाचा तर मुंबईच्या सायन परिसरात असलेल्या षण्मुखानंद हॉलमध्ये ठाकरे गटाचे मेळावा होता. या मेळाव्यामध्ये ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणावर शिंदे गटावर आणि भाजपवर टीकास्त्र करण्यात आले होते. शिंदे गटाकडूनही ठाकरे गटावर टीका करताना महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार Ajit Pawar यांच्यावरही टीका करण्यात आली. शिवसेना वर्धापनदिन सोहळ्यात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खोचक भाष्य केले होते. याप्रकरणीच आता अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी Amol Mitkari यांनी जोरदार पलटवार केला आहे. अजितदादा वेळेत आले म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली अशी खोचक टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. यासंदर्भात अमोल मिटकरी यांनी ट्विट केले आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेते आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट

दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात हे विसरू नका आपल्या ट्विटमध्ये अमोल मिटकरी यांनी म्हंटले आहे की, "रामदास कदमजी आपण जोरात बोललात. "मागुन आलेले अजित दादा थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं". माहितीसाठी सांगतो ते वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली उशिरा आले असते तर हिमालयात जप करायला जावं लागलं असतं. दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात हे विसरू नका..", असे अमोल मिटकरी म्हणाले.

काय म्हणाले होते रामदास कदम?

शिवसेना च्या या सोहळ्यात रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता शिंदे गट आणीत अजित पवार गटातच जुंपली आहे. फडणवीस साहेब धन्यवाद, पण अजितदादा थोडे दिवस महायुतीत आले नसते तर चालले असते. तसेच काही जागांवर योग्य वेळेत उमेदवार जाहीर झाले असते तर आज वेगळेच चित्र दिसले असते असे रामदास कदम म्हणाले होते.

हेही वाचा: ICC T-20 World Cup : बुमराह, अर्शदीप किंवा सिराज, मी मारीन…', अफगाणिस्तानच्या फलंदाजाचा भारतीय गोलंदाजांना खुला इशारा!

शेअर करा