मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Naresh Mhaske : शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंबाबत वादग्रस्त वक्तव्य, 'जसे औरंगजेबाने वडिलांना केले…

MP Naresh Mhaske On Uddhav Thackeray : औरंगजेब वादाच्या दरम्यान, शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी बाळासाहेब ठाकरेंचे काँग्रेसच्या विचारांशी वैर असल्याचा आरोप केला आणि उद्धव ठाकरेंनी त्या शत्रूंशी हातमिळवणी केली.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Naresh Mhaske : शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंबाबत वादग्रस्त वक्तव्य, 'जसे औरंगजेबाने वडिलांना केले…

MP Naresh Mhaske On Uddhav Thackeray : औरंगजेब वादाच्या दरम्यान, शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी बाळासाहेब ठाकरेंचे काँग्रेसच्या विचारांशी वैर असल्याचा आरोप केला आणि उद्धव ठाकरेंनी त्या शत्रूंशी हातमिळवणी केली.

मुंबई :- औरंगजेब वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. दरम्यान, यावर एकनाथ शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धारेवर धरले आहे. MP Naresh Mhaske On Uddhav Thackeray वादग्रस्त विधान करताना त्यांनी उद्धव ठाकरेंना आधुनिक काळातील 'औरंगजेब' म्हटले आहे.उद्धव ठाकरे हे वडील बाळासाहेब ठाकरे यांच्या शत्रूंशी हातमिळवणी करत असल्याचा आरोपही म्हस्के यांनी केला.

शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणाले, "उद्धव ठाकरे हे आधुनिक युगातील औरंगजेब आहेत. बाळासाहेबांना त्यांच्या शेवटच्या काळात त्यांनी किती त्रास दिला, हे सर्वांनाच माहीत आहे. औरंगजेबाने त्यांच्या शेवटच्या काळात वडिलांना ज्याप्रकारे त्रास दिला, भावांना त्रास दिला, ते सर्वांना माहीत आहे.तसंच उद्धव ठाकरेंनीही बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या शेवटच्या काळात त्रास दिला.

त्यांनी पुढे असा दावा केला की, "राज ठाकरे हे अनेकवेळा बोलले आहेत की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या शेवटच्या काळात खूप त्रास दिला. औरंगजेबाने सत्तेसाठी त्यांच्या भावांना संपवले. उद्धव ठाकरेंनी वेगळे काय केले? त्यांनी पद्धतशीरपणे स्वतःच्या भावांना संपवले.

उद्धव ठाकरेंवर आरोप करताना नरेश म्हस्के म्हणाले, "बाळासाहेबांची वैचारिक संपत्ती त्यांनी सोडली, मात्र उर्वरित संपत्तीवर भावाकडे दावा ठोकला." हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या शेवटच्या काळात त्रास दिला.बाळासाहेब ठाकरेंचे काँग्रेसच्या विचारांशी वैर होते, उद्धव ठाकरेंनी त्या शत्रूंशी हातमिळवणी केली. त्यांच्या मृत्यूनंतरही ते शत्रूंशी हातमिळवणी करून शिवसेनेला दुखावत आहेत, त्यामुळे मी उद्धव ठाकरेंना आधुनिक युगाचा औरंगजेब म्हणेन.

शेअर करा