मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sharad Pawar News : शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक! जयंत पाटील यांचा राजीनामा, शशिकांत शिंदेंना नेतृत्वाची गदा

Sharad Pawar News : जयंत पाटील 'मदमुक्त', शशिकांत शिंदे 'पवारविश्वासू' ते प्रदेशाध्यक्ष

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sharad Pawar News : शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक! जयंत पाटील यांचा राजीनामा, शशिकांत शिंदेंना नेतृत्वाची गदा

Sharad Pawar News : जयंत पाटील 'मदमुक्त', शशिकांत शिंदे 'पवारविश्वासू' ते प्रदेशाध्यक्ष

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)मध्ये नेतृत्वबदलाच्या नाट्यमय घडामोडी शनिवारी उघडकीस आल्या. सात वर्षांपासून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले जयंत पाटील Jayant Patil यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी ‘पवारांचे गड सर करणारे सेनापती’ शशिकांत शिंदे यांची वर्णी लागली आहे.ही निवड केवळ बदलाची नसून, पक्षाला नव्या संघर्षासाठी सज्ज करण्याची तयारी असल्याचे संकेतच यातून मिळतात.

"मी मदमुक्त व्हावं हीच विनंती!" — जयंत पाटील यांचा टोकाचा निर्णय

राष्ट्रवादीच्या 10 जूनच्या वर्धापनदिनी जयंत पाटील यांनी राजकीय संकेत दिले होते. “सात वर्षं सेवा केली, आता नव्या पिढीला संधी देण्याची वेळ आहे. हा पक्ष पवार साहेबांचा आहे, निर्णय त्यांचाच असावा,” असं म्हणत त्यांनी राजीनाम्याची पूर्वसूचना दिली होती.आज त्यांच्या विधानाला वास्तवाचा आधार मिळाला.

जयंत पाटील यांचा कार्यकाळ संघर्षांनी भरलेला होता. 2019 च्या निवडणुकीपूर्वी भाजपकडून सुरु असलेल्या गळतीला थोपवणं, आघाडीच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणं, तर अजित पवारांच्या बंडखोरीनंतर पक्षाला पुन्हा उभारी देणं — हे सर्व त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलं.

माथाडी चळवळीपासून राजकीय गड सर करणारा 'पवारांचा सोल्जर'

शशिकांत शिंदे यांचा प्रवास अनोखा आहे. एकीकडे ते कामगार चळवळीतील खंदे नेतृत्व, तर दुसरीकडे पवारांची राजकीय योजना राबवणारे मूकमार्गदर्शक.

1999 मध्ये जावळीच्या गडावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणं असो, की शालिनीताई पाटलांसारख्या भक्कम विरोधकांशी थेट लढणं — शिंदे प्रत्येक वेळेस पवारांच्या बाजूने उभे राहिले.
कोरेगावात त्यांना पराभवाचा स्वाद चाखावा लागला, तरीही पवारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून विधान परिषदेत संधी दिली.

आज तीच निष्ठा पक्षाच्या 'प्रदेशाध्यक्ष' पदाच्या रूपात त्यांच्या हाती आली आहे. 15 जुलैला ते अधिकृतपणे जयंत पाटील यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत.

शेअर करा