मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

मुंबईत मनसे उपाध्यक्ष विनोद लाड यांच्यावर फसवणुकीचा गंभीर आरोप! मालवणीतील महिलेची ५.५० लाखांची लूट, पक्षाच्या नावाचा गैरवापर

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) महाराष्ट्र उपाध्यक्षपदाचा दबदबा वापरून मालाडच्या मालवणी परिसरात राहणारा विनोद लाड याने एका महिलेची तब्बल ५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

V
Vivek

2 मिनिट वाचन

मुंबईत मनसे उपाध्यक्ष विनोद लाड यांच्यावर फसवणुकीचा गंभीर आरोप! मालवणीतील महिलेची ५.५० लाखांची लूट, पक्षाच्या नावाचा गैरवापर

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) महाराष्ट्र उपाध्यक्षपदाचा दबदबा वापरून मालाडच्या मालवणी परिसरात राहणारा विनोद लाड याने एका महिलेची तब्बल ५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. "मुलांना नोकरी लावतो," असे आमिष दाखवून गेल्या दोन वर्षांपासून अनेकांचे पैसे लाटून पसार होणाऱ्या या व्यक्तीने मनसे पक्षाच्या नावाचा गैरवापर करत अनेकांना गंडवल्याचा आरोप आहे. मुंबईकरांनो, सावध व्हा! हा व्यक्ती तुमच्या जवळपास दिसला, तर सतर्क राहा! मालवणीतील एका पीडित महिलेने आपली व्यथा मांडताना सांगितले, की विनोद लाड याने तिच्याकडून ५.५० लाख रुपये उकळले. "माझ्या मुलाला नोकरी लावतो," असे सांगत त्याने ही रक्कम घेतली, पण आता तो फक्त "आज-उद्या" असे टाळाटाळ करत आहे. विशेष म्हणजे, या महिलेचा मुलगा सध्या किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त आहे, आणि त्याच्यासाठी पैशांची नितांत गरज आहे. तरीही, विनोद लाड याने कोणतीही मदत न करता तिला वाऱ्यावर सोडले आहे. "हा भडवा पैसे देत नाही, तर त्याने बंगड्या भरून साडी नेसून सिग्नलवर उभे राहावे किंवा स्वतःची किडनी विकून माझे पैसे परत करावे," अशी संतप्त प्रतिक्रिया या महिलेने दिली आहे.विनोद लाड याने मनसे पक्षाचा उपाध्यक्ष असल्याचा बडेजाव करत अनेकांना फसवल्याचा आरोप आहे. पीडितेने सांगितले, की "मनसे हा गोरगरीब आणि मराठी माणसाचा पक्ष आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. पण विनोद लाडसारखे लोक पक्षाच्या नावाचा वापर फक्त लोकांना लुबाडण्यासाठी करतात." तिने अनेकांकडे मदतीसाठी हातापाया पडूनही कोणी पुढे आले नाही, अशी खंत व्यक्त केली. आता ती थेट मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन न्याय मागणार आहे. "मला विश्वास आहे, राज ठाकरे साहेब या चोराला पाठीशी न घालता माझी मदत करतील," असे तिने ठामपणे सांगितले.या प्रकरणाने मुंबईत खळबळ उडाली आहे. विनोद लाड याच्यासारख्या व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन पीडितेने केले आहे. "हा माणूस कुठे दिसला, तर त्याच्यापासून अंतर राखा. मी लवकरच प्रसारमाध्यमांसमोर येऊन सर्व सत्य उघड करेन आणि ज्यांनी ज्यांनी मला भेटून टाळाटाळ केली, त्यांची नावेही सांगेन," असे तिने स्पष्ट केले. तिने मुंबईकरांना ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करून इतरांना सावध करण्याची विनंती केली आहे.या प्रकरणावर मनसे पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. विनोद लाड याच्यावर पक्ष कारवाई करणार का, की हा प्रकार आणखी गंभीर वळण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईकरांनो, अशा फसव्या लोकांपासून सावध राहा आणि आपल्या मेहनतीच्या पैशांचे रक्षण करा!

हेही वाचा: Anjali Damania On Ajit Pawar : राजकीय वर्तुळात नवा वाद ; सूरज चव्हाण यांना दिलेल्या नव्या जबाबदारीवरून अंजली दमानियांचा अजित पवारांवर निशाणा

शेअर करा