मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Shirsat : "येत्या 3 महिन्यांत राजकारणात मोठा भूकंप होणार"; मंत्री संजय शिरसाट यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

•"एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत हीच सर्वांची इच्छा; भाजप-शिंदे सेनेतील वाक्युद्धादरम्यान मंत्र्यांच्या विधानामुळे चर्चांना उधाण."

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Shirsat

•"एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत हीच सर्वांची इच्छा; भाजप-शिंदे सेनेतील वाक्युद्धादरम्यान मंत्र्यांच्या विधानामुळे चर्चांना उधाण."

मुंबई :- राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील मतभेद आणि वाद चव्हाट्यावर आले आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी सुरू असल्याने महायुतीत सर्व काही ठीक नसल्याची चर्चा रंगली आहे. अशातच शिंदेसेनेचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधताना आगामी 3 ते 4 महिन्यांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचा मोठा दावा केला आहे.

शिवसेना आणि भाजपमध्ये कोणताही वाद किंवा धुसफूस नसली, तरी मित्रपक्षांच्या नेत्यांनी पातळी सोडून टीका करू नये, असा इशाराही शिरसाट यांनी दिला. मात्र, याचवेळी आगामी काळात एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी बरीच चर्चा सुरू असून एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य जनतेचे नेते ('कॉमन मॅन') असल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

आगामी काळ शिवसेनेचाच असणार; आमदार संतोष बांगर यांचीही प्रतिक्रिया

संजय शिरसाट यांच्यापाठोपाठ शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनीही प्रतिक्रिया देत एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत ही प्रत्येक शिवसैनिकाची मनापासून इच्छा असल्याचे म्हटले आहे. आगामी वर्ष हे पूर्णपणे शिवसेनेचे असेल असा विश्वासही नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या अलीकडील गुप्त भेटीबाबत बोलताना शिरसाट यांनी, नेते सांस्कृतिक किंवा वैयक्तिक कार्यक्रमांत भेटत असतात, त्यामुळे लगेच नवीन राजकीय समीकरणे उदयाला येतात असे म्हणणे चुकीचे ठरेल, अशी सावध प्रतिक्रिया दिली. मात्र, संजय शिरसाट यांच्या 3 महिन्यांतील मोठ्या बदलांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळातील उत्सुकता आणि ताण दोन्ही वाढले आहेत.

हेही वाचा: Thane Crime News : मुंब्रा पोलिसांच्या एन.डी.पी.एस. पथकाची धडक कारवाई; 18 वर्षांच्या तरुणाकडून 1 किलोहून अधिक गांजा जप्त

शेअर करा