मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष संपवणार; संजय राऊत यांचा अत्यंत गंभीर दावा

•Sanjay Raut On Amit Shah : भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर संजय राऊत यांचा घणाघात; दोन्ही पक्षांचे अस्तित्व संपुष्टात आणण्याचा डाव असल्याचा केला आरोप

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut,Sanjay Raut Latest News,BJP,Amit Shah,PM Modi,Devendra Fadanavis,thackeary group,udhhav thackeray,Parliament,Water Issue,Maharashtra Politics,Sanjay Raut Criticized PM Modi, Water Leakage in New Parliament

•Sanjay Raut On Amit Shah : भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर संजय राऊत यांचा घणाघात; दोन्ही पक्षांचे अस्तित्व संपुष्टात आणण्याचा डाव असल्याचा केला आरोप

मुंबई :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपच्या राजकारणावर पुन्हा एकदा अत्यंत तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींवर बोलताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लवकरच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राजकीयदृष्ट्या संपवून त्यांचे अस्तित्व मिटवणार आहेत, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. पक्षातील फोडाफोडी आणि अंतर्गत राजकारणामागील खरी रणनीती ही मित्रपक्षांचे अस्तित्व संपवण्याची असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

"पक्ष फोडणाऱ्यांना भविष्यात याचे परिणाम भोगावे लागतील"

माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, सत्तेचा गैरवापर करून प्रादेशिक पक्ष फोडण्याचे आणि त्यांना खिळखिळे करण्याचे राजकारण सातत्याने सुरू आहे. जे पक्ष आणि नेते आज सत्तेच्या मोहात येऊन इतर पक्षांना तोडण्याचे काम करत आहेत, भविष्यात त्यांनाही याच राजकारणाचा फटका बसणार असून त्यांचे स्वतःचे राजकीय अस्तित्व धोक्यात येणार आहे. भाजपच्या या धोरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती आणि परंपरेला मोठे नुकसान पोहोचत असल्याची टीका त्यांनी केली.

महायुतीमधील अंतर्गत समन्वयावर प्रश्नचिन्ह

संजय राऊत यांच्या या विधानामुळे महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आगामी राजकीय समिकरे आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली जात असून, या ताज्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा: Imran Khan : परदेशी नागरिकाला भारतात आंदोलनाचा अधिकार नाही; अभिनेता इम्रान खानला मुंबई उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे

शेअर करा