मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut ; “टायगर अभी जिंदा है!” — 5 जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार ; संजय राऊत

Sanjay Raut On Thackeray Brother : मोदी-शहांना दाखवून देऊ, महाराष्ट्र कधीही झुकत नाही” — संजय राऊत

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut ; “टायगर अभी जिंदा है!” — 5 जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार ; संजय राऊत

Sanjay Raut On Thackeray Brother : मोदी-शहांना दाखवून देऊ, महाराष्ट्र कधीही झुकत नाही” — संजय राऊत

मुंबई – “शिवसेनेचे “टायगर अभी जिंदा है!”… महाराष्ट्र अजूनही जागा आहे,” असे सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. Sanjay Raut On Thackeray Brother 5 जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असून, मराठी विजय दिनानिमित्त शिवतीर्थावर विजयी सभा घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

संजय राऊत म्हणाले, “नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला दुर्बल करण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही अजून आहोत — टायगर अभी जिंदा है! 5 तारखेला आम्ही त्यांनाही बोलवणार आहोत, बघा कशी मराठी एकजूट असते.”

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या तयारीनं राज्याच्या राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. राऊत म्हणाले, “राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. आम्ही शिवतीर्थावर कार्यक्रम घेण्याची परवानगी मागितली आहे, पण ती मिळालेली नाही. यावर राज ठाकरे यांनी पर्यायी सभागृह सुचवले आहे.”

हेही वाचा: BJP State President : रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड

राऊतांनी यावेळी भाजप सरकारच्या भूमिकेवरही टिका करत फडणवीस यांना सुनावलं, “तुम्ही जीआर काढून शिवसेना जन्माला घातल्याच्या गोष्टी सांगता, पण ती स्थापना मनातली होती, कागदावरची नव्हे.”

विजयी सभेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, डाव्या पक्षांनाही निमंत्रण दिलं जाणार असून, ही सभा पक्षपाताच्या पलीकडे जात महाराष्ट्राच्या अस्मितेचा एल्गार ठरेल, असं राऊतांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा: Mumbai Crime News : 25 लाखांच्या बनावट नोटांसह एकजण अटक, काळाचौकी पोलिसांची मोठी कारवाई

शेअर करा