मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : मराठी माणसाची एकजूट तुटणार नाही, उद्धव-राज ठाकरे एकत्र मोर्चासाठी सज्ज!

•संजय राऊतांचा दावा ,5 जुलैचा मोर्चा ठरणार ऐतिहासिक,फडणवीस-शिंदेंवर टीका

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut News

•संजय राऊतांचा दावा ,5 जुलैचा मोर्चा ठरणार ऐतिहासिक,फडणवीस-शिंदेंवर टीका

मुंबई | "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कितीही प्रयत्न केले, तरी मराठी माणसाची एकजूट तुटणार नाही," असा ठाम दावा शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 5 जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे.

या मोर्चात शरद पवार यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी होण्याचे आदेश दिले असून, काँग्रेससह अनेक छोटे पक्षही यात सामील होणार असल्याचा दावा राऊत यांनी केला. या ऐतिहासिक एकत्रीकरणामुळे मोर्चाला राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्व असल्याचे ते म्हणाले.

"पूर्वी एकमेकांपासून दूर राहणारे नेते आता एकत्र गप्पा मारताना, चहा पिताना दिसत आहेत. याचाच अर्थ येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र येतील, अशी आमची भूमिका आहे," असं राऊत यांनी स्पष्ट केलं. तसेच, "मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा भगवा फडकवण्याची वेळ आली आहे," असं ठासून सांगितलं.

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोर्चाला बदनाम करण्याचा आरोप केला आहे. "फडणवीस उद्धव ठाकरे यांच्याबाबत चुकीची विधाने करत आहेत. त्यांच्या विधानांमुळे गैरसमज पसरवले जात आहेत," असं ते म्हणाले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर बोलताना राऊत म्हणाले, "हे धोरण केंद्र सरकारचं आहे. यावर अभ्यास करण्यासाठी समिती नेमणे म्हणजे निर्णय मान्य करणे नव्हे." तसेच, "या धोरणाची अंमलबजावणी करणारा जी.आर. उद्धव ठाकरे नव्हे, तर फडणवीस सरकारने काढला होता," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा: Dombivli Crime News : कोपर उड्डाण पुलाजवळ महिलेला लुटले; भर रस्त्यात धक्का देऊन मंगळसूत्र हिसकावलं!

शेअर करा