मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : मुख्यमंत्री फडणवीसांवर संजय राऊत यांचा घणाघात! "हनी ट्रॅपचे दूध का दूध, पाणी का पाणी करा"

Sanjay Raut On Honey Trap : जळगावमधील लोढा-महाजन फोटोवरून सीबीआय चौकशीची मागणी

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut: Sanjay Raut's attack on Chief Minister Fadnavis! "Make honey trap milk or milk, water or water"

Sanjay Raut On Honey Trap : जळगावमधील लोढा-महाजन फोटोवरून सीबीआय चौकशीची मागणी

मुंबई :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या हनी ट्रॅप प्रकरणावरून आता राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. "राज्यात हनी ट्रॅप नाही" असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असला तरी, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आरोपांचा भडिमार केला आहे.

आज (21 जुलै) संजय राऊत यांनी जळगावच्या प्रफुल्ल लोढा आणि मंत्री गिरीश महाजन यांचा फोटो ट्विट करत मुख्यमंत्री फडणवीस यांना थेट खुलं आव्हान दिलं आहे. "या एका फोटोची CBI चौकशी करा, दूध का दूध, पाणी का पाणी होईल!" असा ठाम शब्दांत त्यांनी सवाल केला आहे.

पत्रकार परिषदेत त्यांनी पुढे सांगितले की, "हे सरकार महाराष्ट्राला कलंकित करत आहे. बारमध्ये बारबाला सापडत आहेत, आमदार निवासात मारामाऱ्या होतात आणि विरोधकांवर हनी ट्रॅप लावले जात आहेत. चार मंत्र्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवलं गेलं असून त्यातील दोन भाजपचे आहेत," असा गंभीर आरोप त्यांनी केला.

संजय राऊत यांचा दावा आहे की, प्रफुल लोढा हनी ट्रॅपद्वारे भाजपसाठी अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना जाळ्यात ओढत होता. "हा माणूस केवळ भाजपचा हस्तक नाही, तर विरोधकांनाही जेरबंद करणारा एक माध्यम होता. पण आता त्याच्याच जाळ्यात भाजपचे लोक सापडले आहेत," असे म्हणत त्यांनी फडणवीसांवर नैतिकतेचा सवाल उपस्थित केला.

"पेन ड्राइव्ह आणि सीडी लपवण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू आहे," असा दावा करत त्यांनी सांगितलं की, लोढा प्रकरणाची सूत्र जामनेर, जळगाव, नाशिक, मुंबई ते थेट दिल्लीपर्यंत हलली आहेत.शेवटी त्यांनी टोला लगावला की, "भाजपची वॉशिंग मशीन सर्व डाग धुत नाही, हा एक डाग आता उघड झालाय!"

शेअर करा