मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : राज ठाकरे-फडणवीस भेटीवर राऊतांचा खोचक टोला; म्हणाले, ‘कदाचित गणपतीचे आमंत्रण द्यायला गेले असतील’

•‘पावसामुळे मुंबई बुडाली, पण कुणीही इतका त्रास करून घेऊ नये’; राऊतांचा भाजपवर खास चिमटा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut News

•‘पावसामुळे मुंबई बुडाली, पण कुणीही इतका त्रास करून घेऊ नये’; राऊतांचा भाजपवर खास चिमटा

मुंबई :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी भेट घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या भेटीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना खास शैलीत खोचक टोला लगावला आहे.

सध्या सुरू असलेल्या गणपती उत्सवाचा संदर्भ देत संजय राऊत म्हणाले की, "कदाचित राज ठाकरे गणपतीचे आमंत्रण देण्यासाठी 'वर्षा' निवासस्थानी गेले असतील." यासोबतच त्यांनी पावसामुळे मुंबईतील परिस्थितीवरही भाजपला चिमटा काढला. "फडणवीस यांच्या काळात काल मुंबई बुडाली. दोन दिवसांपासून मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे यासारखी शहरं बुडाली आहेत. त्यामुळे कुणी इतका त्रास करून घेण्याची गरज नाही," असा टोलाही त्यांनी लगावला.

‘राज ठाकरे परखड नेते आहेत’

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल बोलताना संजय राऊत यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या. "राज्याच्या राजकारणात अनेक जण मुख्यमंत्र्यांना भेटतातच. पण त्यावर आताच चर्चा कशाला करायची. दोन मोठे नेते भेटत आहेत, एक राज्याचे मुख्यमंत्री आहेत, तर दुसरे राज ठाकरे आहेत. त्यांच्यात बंद दाराआड काय चर्चा झाली, हे राज ठाकरेच सांगतील. ते परखड नेते आहेत," असे म्हणत राऊत यांनी भेटीबद्दलचे अधिक बोलणे टाळले.

या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात असले तरी, राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटणे हा काही राजकीय गुन्हा नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. "उद्या आमचं काही काम असेल तर उद्धव ठाकरे यांनाही मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे. मुख्यमंत्री हा काही एका गटाचा मुख्यमंत्री नाही, तो राज्याचा मुख्यमंत्री असतो," असे सांगत राऊत यांनी भेटीला अप्रत्यक्षपणे समर्थन दिले.

हेही वाचा: Cooperate Election Postponed : राज्यात 285 सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या, सरकारचा मोठा निर्णय

शेअर करा