मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : "डुप्लिकेट लोकांसोबत सत्ता! फडणवीसांच्या ऑफरवर संजय राऊतांचा स्फोटक पलटवार"

Sanjay Raut On Devendra Fadnavis : फडणवीसांचा 'स्कोप'चा टोमणा म्हणजे टपली-टिचकीच – राऊतांची टीका

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut On Devendra Fadnavis : फडणवीसांचा 'स्कोप'चा टोमणा म्हणजे टपली-टिचकीच – राऊतांची टीका

मुंबई : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना "तुमच्यासाठी इकडे येण्याचा स्कोप आहे" अशी दिलेली थेट ऑफर आता चांगलीच गाजू लागली आहे. Sanjay Raut On Devendra Fadnavis फडणवीसांच्या या वक्तव्यावर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी तीव्र आणि स्फोटक प्रतिक्रिया देत भाजपवर खरमरीत टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले, "फडणवीस हे टपल्या, टिचक्या, टोमणे मारण्यात पटाईत आहेत. हे वक्तव्य एखादा विनोदी टोमणा आहे, त्यात गांभीर्य शोधू नका." त्यांनी हेही स्पष्ट केलं की, "शिवसेना सध्या सुप्रीम कोर्टात नाव व चिन्हासाठी लढा देत असून, आमचा पक्ष अस्सल आहे — बाकी सगळे डुप्लिकेट!"

"डुप्लिकेट शिवसेना, डुप्लिकेट राष्ट्रवादी – हीच सत्तेची सोबत?"

राऊतांनी भाजपवर थेट हल्ला चढवत म्हटलं, "फडणवीस सध्या डुप्लिकेट शिवसेना आणि डुप्लिकेट राष्ट्रवादीसोबत सत्ता भोगत आहेत. त्याला कुठलाही वैचारिक अथवा नैतिक पाया नाही. अशा स्थितीत त्यांनी आमच्या शिवसेनेला सत्तेत येण्याची ऑफर देणं ही वैचारिक दिवाळखोरी आहे."

"याला मी ऑफर म्हणत नाही, ही फक्त टपली आहे," असे स्पष्ट शब्दांत राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला. "राजकारण चंचल असतं. उद्या काय होईल ते सांगता येत नाही, पण अशा अस्थिर वास्तवात '2029 पर्यंत स्कोप नाही' म्हणणं हास्यास्पद आहे," असेही ते म्हणाले.

कालच्या फोटोसेशनदरम्यान उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये दिसले, मात्र त्यांनी एकमेकांशी संवाद साधलेला नव्हता. यावर राऊत म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी शिंदेंच्या मांडीवर बसावं अशी अपेक्षा होती का? गद्दारांसोबत हस्तांदोलन करायचं नसतं, महाराष्ट्राने हे पाहिलं आहे."

दरम्यान, संजय राऊत यांनी हेही उघड केलं की, उद्धव ठाकरे लवकरच दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. "काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांचा कालच फोन आला होता. इंडिया आघाडीची बैठक लवकरच होईल. यावेळी राष्ट्रीय राजकारणाची दिशा ठरवली जाईल," असे त्यांनी स्पष्ट केलं.

शेअर करा