मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : नरेंद्र मोदी आता महिलांच्या मंगळसूत्रावर… शिवसेना खासदार संजय राऊत

Sanjay Raut Target PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगळसूत्र बाबत केलेल्या वक्तव्यावर खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut :

Sanjay Raut Target PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगळसूत्र बाबत केलेल्या वक्तव्यावर खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला

मुंबई ‌ :-शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी पंतप्रधानांच्या मंगळसूत्रवरील विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. आज प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांच्यावर टीका केली आहे. नरेंद्र मोदी आता महिलांच्या मंगळसूत्रावर हात घालायला लागले आहेत.काँग्रेस आई-बहिणींचे मंगळसूत्र पण शिल्लक ठेवणार नाही असे विधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील निवडणूक सभेत केले होते. Maharashtra Lok Sabha Election Update

मोदींच्याच काळात मंगळसूत्रे लुटली जातायेत संजय राऊत म्हणाले, "नरेंद्र मोदी आता महिलांच्या मंगळसूत्रावर हात घालत आहेत. काँग्रेसच्या काळात नव्हे तर उलट मोदींच्याच काळात महिलांची मंगळसूत्रे गहाण ठेवली जात आहेत, लुटली जात आहेत. जो माणूस स्वतःच्या घरातील मंगळसूत्राची प्रतिष्ठा ठेऊ शकत नाही त्यांनी इतरांच्या मंगळसूत्राची उठाठेव करू नये", अशी जहरी जहरी टीका राऊतांनी केली. Maharashtra Lok Sabha Election Update

नोटबंदीमुळे महिलांनी मंगळसूत्रे गहाण ठेवली तसेच पुढे ते म्हणाले, "मोदींनी आणलेल्या नोटबंदीमुळे लाखो महिलांना मंगळसूत्रे गहाण ठेऊन घर चालवावे लागले. लॉकडाऊनमध्ये अनेकांचा रोजगार गेला तेव्हा लाखो महिलांना मंगळसूत्रे विकून घर चालवावे लागले. शिवाय मणिपूरला किती महिलांची मंगळसूत्र गेली त्याला जबाबदार मोदी आहेत. काश्मीरमध्ये भाजप पुरस्कृत दहशतवाद्यांमुळे अनेक महिलांच्या मंगळसूत्राचे बलिदान झाले", घणाघात राऊतांनी केली. Maharashtra Lok Sabha Election Update

शेअर करा