मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : दिल्लीत खासदारांना अतिरेक्यांसारखी वागणूक, महिला खासदारांशी गैरवर्तन!'; संजय राऊतांचा मोदी सरकारवर थेट आणि गंभीर आरोप!

Mumbai News :मुंबई : - केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित घोटाळ्याविरोधात दिल्लीत 'इंडिया' (INDIA) आघाडीने काढलेला महामोर्चा मोदी सरकारने अत्यंत दडपशाहीने रोखल्याचा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

दिल्लीत खासदारांना अतिरेक्यांसारखी वागणूक, महिला खासदारांशी गैरवर्तन!'; संजय राऊतांचा मोदी सरकारवर थेट आणि गंभीर आरोप!
दिल्लीत खासदारांना अतिरेक्यांसारखी वागणूक, महिला खासदारांशी गैरवर्तन!'; संजय राऊतांचा मोदी सरकारवर थेट आणि गंभीर आरोप!

Mumbai News :'देशभरात आंदोलनाची ठिणगी पडलीये, आता ही आग शांत होणार नाही'; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यावर राऊत ठाम!

Mumbai News :मुंबई :- केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित घोटाळ्याविरोधात दिल्लीत 'इंडिया' (INDIA) आघाडीने काढलेला महामोर्चा मोदी सरकारने अत्यंत दडपशाहीने रोखल्याचा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी, दिल्लीतील आंदोलनादरम्यान महिला खासदारांशी अत्यंत गैरवर्तन करण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला.या घटनेमुळे संपूर्ण देशात राजकीय ठिणगी पडली असून, आता हे आंदोलन थामणार नसून देशभर पसरणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

'सीमा रक्षण करणारे BSF जवान खासदारांविरोधात तैनात; पावणेतीनशे खासदार अतिरेकी आहेत का?'

दिल्लीतील परिस्थितीचे वर्णन करताना संजय राऊत म्हणाले, "काल राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोगावर काढलेला मोर्चा अभूतपूर्व असाच होता. मात्र, तो रोखण्यासाठी मोदी सरकारने देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या 'बॉर्डर सिक्युरिटी फोर्स' (BSF) चे जवान, सीआरपीएफ (CRPF) आणि तब्बल दीड लाख पोलीस रस्त्यावर उतरवले होते. जणू काही विरोधी पक्षांचे पावणेतीनशे खासदार अतिरेकी आहेत, अशा पद्धतीने हा लष्करी लवाजमा तैनात करण्यात आला होता. हे लोकशाहीचे मोठे दुर्दैव आहे."

ते पुढे म्हणाले, "निवडणूक आयुक्त जर देशाच्या लोकप्रतिनिधींना आणि खासदारांना भेटणार नसतील, तर मग ते कोणाला भेटणार? मोदी-शाहांना की चोर-लफंग्यांना भेटणार? बंदुकीच्या बळावर खासदारांना रोखण्यात आले, अटक करण्यात आली आणि रात्री साडेअकरा वाजेपर्यंत राहुल गांधींना अटकेत ठेवण्यात आले."

'आता आंदोलन थांबणार नाही; ज्ञानेश कुमारांना पद सोडावेच लागेल'

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम राहताना राऊत म्हणाले, "आता हे आंदोलन येथेच थांबणार नाही. देशभरात संतापाची ठिणगी पेटली आहे. राहुल गांधी पुढील रणनीती आखत आहेत. नियोजित कामांमुळे आम्हाला मुंबईत यावे लागले असले, तरी आम्ही पुन्हा दिल्लीत जाणार आहोत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना आता राजीनामा द्यावाच लागेल."

'दुष्काळी महाराष्ट्रात जाहिरातींवर 400-500 कोटींचा उधळपट्टी; ही कसली संस्कृती?'

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल करताना राऊत म्हणाले, "अमित शाह सध्या कुठे भूमिगत झाले आहेत? पंतप्रधान मोदी या विषयावर का गप्प आहेत? शासन-प्रशासनात 25 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून दुष्काळी परिस्थिती असलेल्या महाराष्ट्रात शेकडो कोटींच्या जाहिराती बाजी चालवली जात आहे. जाहिरातींवर उधळलेले हे 400 ते 500 कोटी रुपये वाचवले असते, तर आज राज्यातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असता. ही केवळ एकतर्फी चमचेगिरी सुरू आहे, पण राहुल गांधींनी या चमचेगिरीचा अंत करण्याची वेळ आता आणली आहे."

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा