मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : "मोदींनी देशाची बदनामी केली; गुजरातला तेल, बाकी देशाला केवळ रांगा"; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Sanjay Raut On PM Modi : "आखातात तेल विहिरी पेटल्यात आणि हे सरकार खोटे बोलतेय"; गॅस टंचाईवरून सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची राऊतांची मागणी

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut: "BJP is 'D Gang'! - Sanjay Raut's explosive attack"

Sanjay Raut On PM Modi : "आखातात तेल विहिरी पेटल्यात आणि हे सरकार खोटे बोलतेय"; गॅस टंचाईवरून सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची राऊतांची मागणी

मुंबई :- देशात निर्माण झालेली इंधन आणि गॅस टंचाई ही वस्तुस्थिती असतानाही सरकार केवळ खोटेपणा करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. "आखातातील तेल विहिरींना आगी लागल्या आहेत, पण पंतप्रधान आणि भाजप नेते लोकांना विश्वासात घेण्याऐवजी धार्मिक भावनांचे राजकारण करत आहेत," अशा शब्दात राऊतांनी केंद्र व राज्य सरकारवर प्रहार केला.

आखातातील युद्धाची भीषणता आणि खोटा दावा:

राऊत म्हणाले की, "इराणच्या 'खर्ग' बेटावर बॉम्ब टाकून तेल विहिरी जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. ट्रम्प यांना युद्धात मजा येत आहे आणि अशा माणसाच्या राष्ट्राशी मोदींनी गुलामीचा करार केला आहे. इंधन आणि गॅसची मोठी टंचाई असतानाही सरकार 'काहीही कमी पडणार नाही' असे खोटे दावे कोणत्या आधारावर करत आहे?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हॉटेल व्यवसाय आणि तीर्थक्षेत्रांवर परिणाम

मुंबईतील परिस्थितीवर भाष्य करताना राऊत म्हणाले, "गॅस टंचाईमुळे मुंबईतील 40% हॉटेल व्यवसाय बंद झाला आहे. कामगार पुन्हा गावाकडे परतत आहेत. इतकेच नाही तर अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये प्रसादाची कपात करण्यात आली आहे. हे वास्तव सरकारने मान्य केले पाहिजे."

'पंतप्रधान केवळ गुजरातचे आहेत का?'

सरकारच्या पक्षपाती धोरणावर टीका करताना राऊत यांनी खळबळजनक आरोप केला. "पुढील दोन महिन्यांसाठी गुजरातला पुरेसे तेल आणि गॅस उतरवला जाईल. आम्ही सांगितल्याप्रमाणे जहाजे गुजरातला गेली आहेत. मोदी हे केवळ गुजरातचे पंतप्रधान आणि अमित शाह गुजरातचे गृहमंत्री असल्यासारखे वागत आहेत. बाकीचा देश मेला तरी चालेल, पण गुजरातला झुकते माप दिले जात आहे," असे राऊत म्हणाले.

सर्वपक्षीय बैठकीची मागणी

"फक्त मोदींच्या नावाने भजन करून गॅसच्या रांगा संपणार नाहीत. सरकारने या विषयावर तातडीने सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवावी. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही केवळ केंद्राची पाठराखण न करता राज्यातील जनतेच्या प्रश्नासाठी दोन्ही विधिमंडळात चर्चा घडवून आणली पाहिजे," अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

शेअर करा