मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : "कोकाटेंचा राजीनामा अटळ! प्रफुल्ल लोढा प्रकरणातील 'मोठा मासा' मंत्रिमंडळातच बसलेला" — संजय राऊतांचा सरकारवर घणाघात

•"कृषिमंत्री रमी खेळतात, पण राजीनामा घेतला जात नाही — हे सरकारचं दुर्बलपण!"

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut News

•"कृषिमंत्री रमी खेळतात, पण राजीनामा घेतला जात नाही — हे सरकारचं दुर्बलपण!"

मुंबई :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर तोफ डागली आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही परिस्थितीत राजीनामा द्यावा लागेल, असा ठणकाव त्यांनी केला आहे. एवढ्यावरच न थांबता, प्रफुल्ल लोढा प्रकरणावरून मंत्रिमंडळातील 'मोठ्या मासा'ची उपस्थितीही त्यांनी अधोरेखित केली आहे.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊतांनी सरकारवर ताशेरे ओढले. कोकाटेंवर टीका करताना त्यांनी टोला लगावला, "ज्यांना आपलं खातं ओसाड गाव समजतं, तेच रमी खेळत बसतात आणि तरीही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही — हे या सरकारचं दुबळेपण आहे!"

"राजीनामा द्यावा लागेल, आणि घ्यावाही लागेल", अशी ठाम घोषणा करत राऊतांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची 'मजबुरी' कोणती, असा रोखठोक सवालही केला.

प्रफुल्ल लोढा प्रकरणावर बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. "लोढा हा केवळ एक छोटा मासा आहे, पण मोठा मासा तर मंत्रिमंडळातच बसलेला आहे," असा गंभीर आरोप करत त्यांनी या प्रकरणाचा तपास फक्त केंद्रीय यंत्रणाच करू शकतील, अशी मागणी केली.

"लोढाचे कोणासोबत फोटो आहेत, हे गौण आहे. तो काय सांगतोय हे जास्त महत्त्वाचे!" असे सांगत राऊतांनी प्रफुल्ल लोढाकडे मंत्रिमंडळातील 'मोठ्या मासा'विरोधात पुरावे असल्याचा इशारा दिला. काही दिवसांपूर्वी त्यांनी हनीट्रॅप प्रकरणात चार मंत्री अडकल्याचा आरोप केला होता, त्यालाही पुन्हा उजाळा दिला.

याशिवाय, राऊतांनी शिंदे गटावरही घणाघात केला. "एकनाथ शिंदे यांच्याकडे फक्त 8 आमदार निवडून आणण्याची ताकद आहे, महायुतीचा हा ढोल फार दिवस वाजणार नाही," असेही त्यांनी थेट सांगून टाकले.

हेही वाचा: Panvel Bribe News : पनवेलचा ‘खाकी’ खाक्यात! लाच घेताना पनवेलचा पोलीस उपनिरीक्षक रंगेहाथ गजाआड!

शेअर करा