मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : ‘या लोकांना सोबत घेऊन काम करणे अवघड आहे’, फडणवीसांनी अमित शहांना सांगितले; राऊतांचा मोठा दावा

•'मंत्र्यांचे खातेबदल ही थातूरमातूर कारवाई'; कलंकित सरकारमधील मंत्र्यांना जावेच लागेल, संजय राऊत यांचा इशारा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut

•'मंत्र्यांचे खातेबदल ही थातूरमातूर कारवाई'; कलंकित सरकारमधील मंत्र्यांना जावेच लागेल, संजय राऊत यांचा इशारा

मुंबई :- विधिमंडळात 'रमी' प्रकरणानंतर माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा खाते देण्यात आले आहे. या राजकीय घडामोडींवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसंदर्भात एक मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी या भेटीत फडणवीस यांनी आपल्याच मंत्र्यांबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे म्हटले आहे.

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, "हे सरकार कलंकित झाले आहे. मी खात्रीने सांगतो की यातील काही मंत्र्यांना जावे लागेल." फडणवीस-शाह यांच्या भेटीबाबत माहिती आल्याचा दावा करत राऊत म्हणाले, "या भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांना सांगितले आहे की, अशा लोकांबरोबर मला काम करणे अवघड झाले आहे. सरकारची आणि राज्याची बदनामी होत आहे."

राऊत यांनी वसईच्या आयुक्तांवर पडलेल्या धाडीचा संदर्भ देत, हे एक हजार कोटींचे प्रकरण असून, यात एका मंत्र्याला जावेच लागेल असा दावा केला. "मंत्र्यांचा खातेबदल ही थातूरमातूर कारवाई आहे," असे सांगत, "आरोपी मंत्री आणि त्यांचे बॉस आपल्या माणसांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जनता, सामाजिक कार्यकर्ते यावर काहीही फरक पडणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.

राऊत पुढे म्हणाले की, "या मंत्र्यांना जावे लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला. तसेच, दिल्लीने अजित पवार यांना न सांगता भुजबळ यांना मंत्री केले," असेही त्यांनी सांगितले. संजय राऊत यांच्या या आरोपांमुळे महायुती सरकारमधील अंतर्गत धुसफुस पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

हेही वाचा: Ulhasnagar Crime News : ‘अधिक परताव्या’च्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाला 5.77 कोटींचा गंडा

शेअर करा