मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : ‘पैशांचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका’; संजय राऊतांचा अजित पवारांवर घणाघात, सरकारवर जहरी टीका

•मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा केवळ ‘भास’; ‘पाण्याच्या बॉटलवर फोटो लावून मदत होत नाही’

V
Vivek

1 मिनिट वाचन

sanjay raut, shiv sena ubt, shiv sena ubt sanjay raut, hit and run case, mumbai hit and run case, bmw hit and run case, worli hit and run case, mihir shah, rajesh shah, eknath shinde, shinde sena, shiv sena, sanjay raut on mumbai hit and run case, sanjay raut on bmw hit and run case, sanjay raut on worli hit and run case, mumbai hit and run case latest, bmw hit and run case latest, worli hit and run case latest, mumbai hit and run case news, bmw hit and run case news, worli hit and run case

•मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा केवळ ‘भास’; ‘पाण्याच्या बॉटलवर फोटो लावून मदत होत नाही’

मुंबई :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘पैशांचं सोंग आणता येत नाही’ या केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर आज जोरदार टीका केली आहे. ‘जर पैशांचं सोंग आणता येत नाही, तर सरकार चालवू नका,’ असा सल्लाच त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सरकारचा पाहणी दौरा म्हणजे ‘भास’

काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त मराठवाड्याचा दौरा केला होता. या दौऱ्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, “हा पाहणी दौरा म्हणजे केवळ एक भास आहे. ते कधी गेले आणि काय पाहिले? 36 लाख शेतकरी उध्वस्त झाले असताना त्यांनी शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकून घेतला का?” असा सवाल त्यांनी केला. तसेच, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मदतकार्यावर त्यांनी ‘पाण्याच्या बॉटलवर फोटो लावून मदत होत नाही, मदत ही गुप्त असली पाहिजे’ असे म्हणत टोला लगावला.

‘गरीबांसाठी हे दरोडेखोर बनतात’

अजित पवारांनी ‘पैशांचं सोंग आणता येत नाही’ असे विधान करून शेतकऱ्यांची नाराजी ओढवून घेतली आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले, “यांच्या दारुड्या खोऱ्यांमुळेच त्यांच्यावर ही वेळ आली आहे. आमदार-खासदारांना पैसे देण्यासाठी हे ‘संकटमोचक’ बनतात, पण जेव्हा गरिबांना मदत करायची वेळ येते तेव्हा हे ‘दरोडेखोर’ बनतात.” असा घणाघात त्यांनी केला.याचवेळी, त्यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. "केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी काय केले? शासनान हे मुर्दाड आहे," असे जहरी शब्द त्यांनी वापरले.

उद्धव ठाकरे यांचा दौरा

राऊत यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे आज लातूरपासून छत्रपती संभाजीनगरपर्यंत पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. तसेच, भाजपने कोरोना काळात मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यता निधीत पैसे दिले नाहीत, त्यांनी त्यावेळी पीएम केअर्स फंडमध्ये पैसे दिले, अशी आठवणही त्यांनी करून दिली.

हेही वाचा: Asia Cup 2025 : आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारताची धडक; बांगलादेशचा 41 धावांनी केला पराभव, टीम इंडिया 12व्यांदा फायनलमध्ये

शेअर करा