मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : 30 सेकंदांत कोसळलं ड्रीमलायनर; अपघातामागे सायबर हल्ला?संजय राऊतांचा संशय

•ब्रिटन-अमेरिकेच्या यंत्रणाही भारतात; ब्लॅक बॉक्समधून धक्कादायक माहिती येण्याची शक्यता

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut News

•ब्रिटन-अमेरिकेच्या यंत्रणाही भारतात; ब्लॅक बॉक्समधून धक्कादायक माहिती येण्याची शक्यता

मुंबई | एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलायनर विमानाचा अहमदाबादजवळ घडलेला भीषण अपघात अनेक प्रश्न निर्माण करून गेला आहे. या अपघातामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, शुक्रवारी सापडलेल्या ब्लॅक बॉक्सची तपासणी सुरू आहे. विशेष म्हणजे, अवघ्या ३० सेकंदांत हे विमान कोसळल्याने तांत्रिक बिघाड वा सायबर हल्ल्याचा संशय अधिकच गडद झाला आहे.

शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी या अपघातावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. "विमानाच्या दोन्ही इंजिनांनी एकाच वेळी काम करणे थांबवले, हा योगायोग असूच शकत नाही," असं मत त्यांनी मांडलं. राऊत यांच्या मते, हा सायबर हल्ल्याचा भाग असू शकतो. त्यांनी हेही स्पष्ट केलं की, ब्रिटन आणि अमेरिकेतील तज्ज्ञ पथके भारतात दाखल झाली असून, चौकशीच्या दिशेने काम सुरू झालं आहे. भारतीय केंद्रीय यंत्रणाही यामध्ये सहभागी आहेत.

राऊत म्हणाले की, "बोईंग ड्रीमलायनरची खरेदी यूपीए सरकारच्या काळात झाली. त्यावेळी भाजपानेच त्याच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले होते. आज त्याच बोईंगच्या ड्रीमलायनरवर शंका घेण्याची वेळ आली आहे."

सध्या तांत्रिक तपास सुरू असला तरी सायबर हल्ल्याच्या शक्यतेने देशाची सुरक्षा व्यवस्था हादरली आहे. "शत्रू राष्ट्राकडून आपल्या तंत्रज्ञानावर, यंत्रणांवर सायबर हल्ले होतात, ही अतिशय गंभीर बाब आहे. त्याचा सखोल तपास होणे अत्यावश्यक आहे," असं संजय राऊत यांनी ठामपणे सांगितले.

हेही वाचा: Bhayandar Crime News : घरफोडी करून गायब झालेला 'सोन्या'चा चोर अखेर सापडला!

शेअर करा