मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : ‘रक्त आणि क्रिकेट एकत्र वाहू शकतं का?’; पाकिस्तानशी सामन्याच्या निर्णयावरून संजय राऊत आक्रमक, थेट मोदींना पत्र

•जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यानंतरही पाकिस्तानसोबत सामन्याला ‘ग्रीन सिग्नल’, संजय राऊत यांचा सरकारवर निशाणा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut News

•जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यानंतरही पाकिस्तानसोबत सामन्याला ‘ग्रीन सिग्नल’, संजय राऊत यांचा सरकारवर निशाणा

मुंबई :- आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या क्रिकेट सामन्याला मोदी सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने परवानगी दिल्यानंतर आता राजकीय वाद पेटला आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, अनेक स्तरांतून या सामन्याला विरोध होत आहे. याच विरोधाची धार अधिक तीव्र करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपला तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

राऊत यांनी आपल्या पत्रात सरकारवर अनेक प्रश्नांचा भडिमार केला आहे. त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत म्हटले आहे की, जर पाकिस्तानविरुद्धचा संघर्ष अजूनही सुरूच असेल, तर आपण त्यांच्यासोबत क्रिकेट कसे खेळू शकतो? पहलगाम हल्ल्यात 26 महिलांचा सिंदूर पुसला गेला, या वेदनादायक घटनेची आठवण करून देत, राऊत यांनी सरकारला त्या माता-भगिनींच्या भावनांचा विचार करायला सांगितले आहे.

भाजपला मोठी आर्थिक उलाढाल होते का? उद्धव गटाचा सवाल, ‘क्रिकेट’पेक्षा ‘देशभक्ती’ महत्त्वाची

पत्रात पुढे, राऊत यांनी पाकिस्तानसोबत क्रिकेट न खेळल्यास अमेरिका व्यापार थांबवेल, अशी धमकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली आहे का, असा उपरोधिक सवालही केला आहे. ‘रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही’ या पंतप्रधानांच्या जुन्या घोषणेची आठवण करून देत, ते म्हणाले की आता ‘रक्त आणि क्रिकेट एकत्र वाहू लागतील का?’.

या वादग्रस्त निर्णयामागे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. सामन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी आणि जुगार होतो, यात अनेक भाजप सदस्यांचा सहभाग असल्याचा दावा त्यांनी केला. गुजरातचे जय शाह सध्या क्रिकेटचे व्यवहार सांभाळत असल्याने भाजपला यात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सामना महाराष्ट्रात झाला असता, तर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने तो होऊ दिला नसता, असे सांगत राऊत यांनी सरकारवर हिंदुत्व आणि देशभक्तीपेक्षा पाकिस्तानसोबतच्या क्रिकेटला अधिक प्राधान्य दिल्याचा आरोप केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील लोकांच्या भावनांचा अनादर होत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

हेही वाचा: Mumbai Crime News : सायबर फ्रॉड टोळीचा पर्दाफाश; १२ जण अटकेत, ६० कोटींहून अधिक फसवणूक उघड

शेअर करा