मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : भाजप म्हणजे 'दुतोंडी गांडूळ'; सत्तेसाठी कोणाच्याही शेजेवर जाण्यास तयार: संजय राऊत

•मराठी माणसाच्या हातूनच मराठी माणसाचे 'डेथ वॉरंट' काढले जातेय; ठाकरेंच्या संयुक्त मुलाखतीनंतर राऊतांचा भाजपवर घणाघात

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut News

•मराठी माणसाच्या हातूनच मराठी माणसाचे 'डेथ वॉरंट' काढले जातेय; ठाकरेंच्या संयुक्त मुलाखतीनंतर राऊतांचा भाजपवर घणाघात

मुंबई | निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था आणि प्रशासनात भाजपने बसवलेले अधिकारी मराठीच आहेत. मात्र, दुर्दैवाने मराठी माणसाच्या हातूनच मराठी माणसाचे 'डेथ वॉरंट' काढले जात आहे आणि त्यावर सही देखील मराठी माणसाचीच आहे, हे भाजपचे कसब आहे," अशा बोचऱ्या शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा 'खणखणीत' वार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल पार पडलेली संयुक्त मुलाखत ही खऱ्या अर्थाने 'महाराष्ट्राची मुलाखत' होती, असे राऊत म्हणाले. "दोन धुरंधर एकत्र आले आणि महाराष्ट्राच्या समस्यांवर त्यांनी खणखणीतपणे मते मांडली. ही मुलाखत राज्याच्या दृष्टीने दिशादर्शक आहे," असेही त्यांनी नमूद केले.

सावरकरांवरून मुख्यमंत्र्यांना आरसा दाखवला

वीर सावरकरांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करताना राऊत म्हणाले की, "तुम्ही आम्हाला सावरकरांचे विचार सोडल्याचे सांगता, पण मग सावरकरविरोधी भूमिका घेणाऱ्या नेत्यांना (अजित पवार) मंत्रिमंडळात कशाला ठेवता? सावरकरांचे विचार न मानणारा नेता सोबत घेऊन तुम्ही कसले पोकळ सल्ले देता? एकीकडे सावरकरांचे प्रेम आणि दुसरीकडे विरोधातील नेत्यांशी सत्ता, हा तुमचा दुटप्पीपणा आहे."

भाजप-एमआयएम 'भाई-भाई'

भाजपच्या राजकारणावर टीका करताना राऊतांनी 'दुतोंडी गांडूळ' असा शेलका शब्द वापरला. ते म्हणाले,

"मीरा-भाईंदरमध्ये भाजपने एमआयएमला पाठिंबा दिला आहे. आता 'फडणवीस-ओवेसी भाई-भाई' झालेत का?"

"अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि भाजप एकत्र आले आहेत, मग आता भाजप 'हिरवा' झाला नाही का?"
"अकोटपासून मीरा-भाईंदरपर्यंत एमआयएमसोबत भाजपची छुपी, तर काही ठिकाणी उघड युती आहे."

"जो पेजेला देईल, त्याच्या शेजेवर…"

काँग्रेसमुक्त भारताची घोषणा करणाऱ्या भाजपवर टीका करताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात अर्धी काँग्रेस भाजपनेच पचवली आहे. सत्तेसाठी भाजपला कोणीही चालते. "जो पेजेला (मदत) देईल, त्याच्या शेजेवर चढायला भाजप सदैव तयार असते," अशी टोकदार टीका करत त्यांनी भाजपच्या सत्तेच्या हव्यासावर बोट ठेवले.

हेही वाचा: Hidayat Patel Murder : अकोल्यात रक्ताचा सूड! काँग्रेसचे दिग्गज नेते हिदायत पटेल यांची मशिदीबाहेर निर्घृण हत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

शेअर करा