मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai news : अमित शाह यांची नजर कमजोर झालीय, त्यांचे डोळे नेत्रदानानंतर म्युझियममध्ये ठेवा!' — संजय राऊतांचा घणाघाती व खोचक टोला

Mumbai news :मुंबई :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रकृतीबाबत आणि त्यांनी दिल्लीतील आंदोलनावर केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक आणि खोचक शब्दांत टीकास्त्र सोडले आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

अमित शाह यांची नजर कमजोर झालीय, त्यांचे डोळे नेत्रदानानंतर म्युझियममध्ये ठेवा!' — संजय राऊतांचा घणाघाती व खोचक टोला
अमित शाह यांची नजर कमजोर झालीय, त्यांचे डोळे नेत्रदानानंतर म्युझियममध्ये ठेवा!' — संजय राऊतांचा घणाघाती व खोचक टोला

Mumbai news :लाखोंचा मोर्चा गृहमंत्र्यांना 8 हजारांचाच कसा दिसला?; दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Mumbai news :मुंबई :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रकृतीबाबत आणि त्यांनी दिल्लीतील आंदोलनावर केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक आणि खोचक शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. सोमवारी झालेल्या महामोर्च्यात केवळ आठ हजारच लोक उपस्थित होते, या अमित शाह यांच्या दाव्याचा समाचार घेताना, "अमित शाह यांची प्रकृती बरी नाही, त्यांना डिप्रेशन आणि निराशेने ग्रासले असून त्यांची नजर कमकुवत झाली आहे, त्यामुळे आरोग्य मंत्र्यांनी त्यांच्याकडे तात्काळ वैद्यकीय पथक पाठवावे," असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news

8 हजारांच्या मोर्चासाठी अडीच लाख पोलीस का उतरवले?; भीती वाटतेय म्हणून जंतरमंतरला टाळं लावलं

मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, बऱ्याच काळापासून भूमिगत असलेले अमित शाह अचानक बाहेर आले आणि त्यांनी थेट मोर्चात फक्त आठ हजार लोक असल्याचा दावा केला. यावर उपरोधिक टीका करताना राऊत म्हणाले, "अमित शाह यांचे डोळे नेत्रदानानंतर म्युझियममध्ये ठेवले पाहिजेत, जेणेकरून लोकांना समजेल की या डोळ्यांना दीड किलोमीटरच्या परिसरात जमलेला लाखोंचा महामोर्चा फक्त आठ हजारांचा दिसू शकतो!"

जर मोर्चात फक्त आठच हजार लोक होते, तर मग राज्य सरकारने व पोलिसांनी रस्त्यावर तब्बल अडीच लाख पोलीस का उतरवले होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारला जर आंदोलनाची भीती वाटत नव्हती, तर मग राजधानीतील 'जंतर-मंतर' परिसराला टाळे का लावले आणि घराभोवतीचा परिसर प्रतिबंधित का केला, याचे उत्तर अमित शाह यांनी द्यावे, असे खुले आव्हान त्यांनी दिले.

सीमा खन्ना निवडणूक आयोगाची लेडी डॉन; 2029 पर्यंत मोदी-शाह सत्तेत राहणार नाहीत

घुसखोरांच्या नावांवरील वादावरून बोलताना संजय राऊतांनी मुख्य निवडणूक आयोग आणि अधिकाऱ्यांवरही अत्यंत गंभीर आरोप केले.

घुसखोरांच्या नावांच्या नावाखाली विरोधकांची आणि माजी अधिकाऱ्यांची नावे वगळली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हा माफिया असून सीमा खन्ना ही निवडणूक आयोगाची 'लेडी डॉन' आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. अशा भ्रष्ट लोकांना संरक्षण देण्यासाठीच नवीन कायदे केले जात असल्याचा दावा त्यांनी केला.

भविष्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, अमित शाह यांच्या तोंडून सध्या ज्ञानेश कुमार बोलत आहेत. परंतु, 2029 पर्यंत ना नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार आणि ना अमित शाह गृहमंत्री राहणार, हे आता त्यांनाही चांगलेच समजले आहे, म्हणूनच ते पूर्णपणे वैफल्यग्रस्त झाले आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा