मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Samruddhi Mahamarg : इगतपुरी–आमणे 76 किमी टप्पा आता सुरू; नागपूर-मुंबई प्रवास 8 तासांत शक्य

शिंदेंच्या हस्ते फडणवीसांची गाडी… नेतृत्व आणि मैत्रीचा ‘समृद्ध’ संगम!

V
Vivek

1 मिनिट वाचन

Samruddhi Mahamarg : इगतपुरी–आमणे 76 किमी टप्पा आता सुरू; नागपूर-मुंबई प्रवास 8 तासांत शक्य

शिंदेंच्या हस्ते फडणवीसांची गाडी… नेतृत्व आणि मैत्रीचा ‘समृद्ध’ संगम! ठाणे, (पडघा) | राज्याच्या आधुनिक विकासात मैलाचा दगड ठरलेला 'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग' आज अधिकृतपणे पूर्णत्वास पोहोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकच्या इगतपुरी ते ठाण्यातील आमणे या 76 किमी लांबीच्या अंतिम टप्प्याचे भव्य उद्घाटन झाले. या टप्प्यानंतर नागपूर ते मुंबई हा 701 किलोमीटरचा प्रवास आता केवळ 8 तासांत शक्य होणार आहे.

हा महामार्ग केवळ रस्त्यांचा नाही, तर ‘विकासाची धमनी’ आहे. यामुळे शेतकरी, व्यापारी, उद्योगपती आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी संधींच्या नव्या वाटा खुल्या झाल्या आहेत.

आजच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मान्यवर नेत्यांची उपस्थिती होती. या ऐतिहासिक प्रवासाच्या सुरुवातीला एक अनोखा क्षण पाहायला मिळाला – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांची गाडी चालवली. याआधी शिंदे मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी त्यांच्या गाडीला स्टेअरिंग दिलं होतं – हा एक प्रतीकात्मक मैत्रीचा क्षण ठरला.

या महामार्गाच्या माध्यमातून राज्यातील शहरे, उद्योग, शेती, पर्यटन आणि रोजगाराला मोठा हातभार लागणार आहे. समृद्ध महाराष्ट्राच्या दिशेने हे एक 'सोन्याचं पाऊल' ठरणार, यात शंका नाही!

हेही वाचा: Corona News Update : महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा शिरकाव; एका दिवसात 105 नवे रुग्ण

शेअर करा