मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Samruddhi Mahamarg : सरकारचा मोठा निर्णय, समृद्धी महामार्ग पुण्याला जोडणार!

Samruddhi Mahamarg : पुण्यातील प्रवास आता आणखी सोपा होणार आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : पुण्यातील प्रवास आता आणखी सोपा होणार आहे. पुणे समृद्धी महामार्गाने जोडण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याच्या शिंदे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे.

पुणे :- पुणेकरांसाठी सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. समृद्धी महामार्ग Samruddhi Mahamarg पुण्याला जोडण्याचा निर्णय शिंदे सरकारने मंत्रिमंडळाच्या Cabinet Meeting बैठकीत घेतला आहे. या आराखड्यांतर्गत पुणे ते शिरूर दरम्यान 53 किमी लांबीचा सहास्तरीय उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला असून तो अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर मार्गे समृद्धी महामार्गाला जोडेल.

नवीन उड्डाणपूल केसनांद गावातून सुरू होऊन शिरूरपर्यंत जाणार असून त्याच्या बांधकामासाठी 7515 कोटी रुपये खर्च येणार आहे. तथापि, अहमदनगरमार्गे हा उड्डाणपूल समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी अतिरिक्त 2050 कोटी रुपये लागतील आणि एकूण खर्च 9565 कोटी रुपये होईल. या महामार्गाची एकूण लांबी 250 किलोमीटर असेल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. या सुधारित मार्गांतर्गत पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा राष्ट्रीय महामार्ग जो पूर्वी 'एनएचएआय' बांधणार होता, तो आता 'एमएसआयडीसी' अंतर्गत बांधला जाणार आहे.एप्रिलमध्ये झालेल्या करारानुसार हा प्रकल्प 'एमएसआयडीसी'कडे सुपूर्द करण्यात आला असून आता त्यावर वेगाने काम सुरू करण्यात येणार आहे.

या प्रकल्पामुळे पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमधील कनेक्टिव्हिटी तर सुधारेलच, शिवाय या भागाचा आर्थिक आणि सामाजिक विकासही नव्या उंचीवर जाईल.

हेही वाचा: Jalna News : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी चर्चा केली, जाणून घ्या इतर कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली

शेअर करा