मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

सलमान खानच्या पायात फाटके बूट की फॅशन ?

मुंबई : बॉलिवूड सूपरस्टार सलमान खान त्याच्या साधेपणासाठी ओळखला जातो; पण नुकताच त्याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमावर तुफान व्हायरल झाला.

DJ
Dattatraya Jadhav

1 मिनिट वाचन

Salman Khan shoes
Salman Khan shoes

मुंबई : बॉलिवूड सूपरस्टार सलमान खान त्याच्या साधेपणासाठी ओळखला जातो; पण नुकताच त्याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये सलमानने घातलेले काळे फॉर्मल बूटसमोरून फाटलेले दिसत होते. हे पाहून नेटकऱ्यांनी 2900 कोटींचा मालक आणि पायात फाटलेले बूट का घालतोय? असे प्रश्न विचारत त्याला ट्रोल करायला सुरुवात केली.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सलमान आपल्या गाडीतून उतरताना दिसत आहे. यावेळी त्याने चेक शर्ट, डोळ्यावर काळा गॉगल आणि हातात महागडे घड्याळ असा डॅशिंग लूक केला होता ; पण कॅमेरा जेव्हा त्याच्या पायांकडे वळला, तेव्हा सर्वांना धक्काच बसला.  त्याने घातलेले बूट जागोजागी फाटलेले आणि मळलेले दिसत होते. मात्र, यामागची दोन महत्त्वाची कारणे आता समोर येत आहेत.

काही फॅशन तज्ज्ञांच्या मते, सलमानने घातलेले बूट फाटलेले नसून, ती एक आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँडची फॅशन आहे. याला डिस्ट्रेस्ड लूक किंवा बॅटर्ड स्टाईल असे म्हणतात. अशा प्रकारच्या बुटांची किंमत तब्बल १.५ लाख रुपयांच्या आसपास असू शकते. विशेषता: मोठ्या ब्रँड्सकडून मुद्दाम जुने आणि फाटलेले दिसतील असे बूट तयार केले जातात, जे सध्या जागतिक फॅशनमध्ये चर्चेत आहेत.

काही रिपोर्ट्सनुसार, सलमान खानच्या या बुटांमागे एक भावनिक कारण असल्याचे सांगण्यात येते. हे बूट त्याला त्याचे वडील सलीम खान यांनी अनेक वर्षांपूर्वी भेट दिले होते. सलमान अनेकदा आपल्या जवळच्या आणि खास वस्तू खूप काळ जपून वापरतो, त्यामुळे फाटलेले असूनही तो तेच बूट आनंदाने वापरताना दिसत आहे, असे काही जण सांगतात. जेव्हा या बुटांची किंमत आणि त्यामागची भावना समोर आली, तेव्हा चाहत्यांनी सलमानच्या साधेपणाचे कौतुक केले आहे.भाईजानची स्टाईल जिथे संपते, तिथे इतरांची फॅशन सुरू होते, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.

Salman Khan: Worn-out Shoes or a Fashion Statement?

शेअर करा