मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

रुपाली चाकणकरांचा 'दुहेरी' राजीनामा! महिला प्रदेशाध्यक्षपदही सोडलं; 'शिवनिका' ट्रस्टच्या संचालिका असल्याने अडचणीत वाढ

Rupali Chakankar Latest News : अशोक खरात प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी; मुख्यमंत्र्यांचा इशारा आणि विरोधकांच्या दबावापुढे अखेर झुकल्या

V
Vivek

2 मिनिट वाचन

रुपाली चाकणकरांचा 'दुहेरी' राजीनामा! महिला प्रदेशाध्यक्षपदही सोडलं; 'शिवनिका' ट्रस्टच्या संचालिका असल्याने अडचणीत वाढ

Rupali Chakankar Latest News : अशोक खरात प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी; मुख्यमंत्र्यांचा इशारा आणि विरोधकांच्या दबावापुढे अखेर झुकल्या

मुंबई :- नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात Ashok Kharat याच्या लैंगिक अत्याचार आणि 'पॉक्सो' प्रकरणाचे वादळ आता थेट राजकीय उच्चपदस्थांपर्यंत पोहोचले आहे. या प्रकरणात नाव अडकलेल्या रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. खरातला 'गुरू' मानणाऱ्या आणि त्याच्या 'शिवनिका' ट्रस्टमध्ये सक्रिय असलेल्या चाकणकरांवर गेल्या काही दिवसांपासून राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव होता, ज्यापुढे अखेर त्यांनी नमते घेतले आहे.

'शिवनिका' ट्रस्टचे कनेक्शन आणि चौकशीचा ससेमिरा

रुपाली चाकणकर या केवळ अशोक खरातच्या भक्त नव्हत्या, तर त्या त्याच्या 'शिवनिका' (Shivanika) ट्रस्टच्या संचालिका होत्या, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून कोणते आर्थिक व्यवहार झाले आणि त्यात चाकणकरांची काय भूमिका होती, याची चौकशी आता एसआयटी (SIT) करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "अशोक खरातच्या ट्रस्टच्या सर्व संचालकांची चौकशी केली जाईल आणि दोषींना सोडले जाणार नाही," असा कडक इशारा दिल्याने चाकणकरांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

"माझा गैरकृत्याशी संबंध नाही" – चाकणकरांचे स्पष्टीकरण

दोन्ही पदांचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी आपली बाजू मांडली आहे. "अशोक खरातच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा गैरकृत्यात माझा दुरान्वयेही संबंध नाही. या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी मी स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे केली आहे. पोलीस तपासात दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल," असे त्यांनी म्हटले आहे.

विरोधकांचा आणि स्वकीयांचाही दबाव

अशोक खरातसोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे आणि इतर विरोधी नेत्यांनी चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी रान पेटवले होते. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटानेही या प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याची भावना व्यक्त करत चाकणकरांनी पद सोडावे, अशी भूमिका घेतल्याची चर्चा आहे. याच अंतर्गत आणि बहिर्गत दबावामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्द केले आहेत.

राजकीय हस्तक्षेप केल्याचा संशय

खरातने केलेल्या शेकडो महिलांच्या शोषणाप्रकरणी यापूर्वी जेव्हा तक्रारी आल्या होत्या, तेव्हा चाकणकर यांनी आपल्या पदाचा वापर करून पोलीस तपासात अडथळा निर्माण केला किंवा राजकीय हस्तक्षेप केला का? या दिशेनेही आता एसआयटी तपास करत आहे. जर असा हस्तक्षेप सिद्ध झाला, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार असेल.

शेअर करा