मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : धर्मांतर कायद्यानुसार दाखल गुन्हा रद्द करण्याची रिपब्लिकन पार्टीची मागणी

धर्मांतर कायद्यानुसार दाखल गुन्हा रद्द करण्याची रिपब्लिकन पार्टीची मागणी

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

धर्मांतर कायद्यानुसार दाखल गुन्हा रद्द करण्याची रिपब्लिकन पार्टीची मागणी
धर्मांतर कायद्यानुसार दाखल गुन्हा रद्द करण्याची रिपब्लिकन पार्टीची मागणी

Pune News : महाराष्ट्र मिरर पुणे, २२ ऑगस्ट : महाराष्ट्रात लागू होणाऱ्या नव्या धर्मांतरविरोधी कायद्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील खडकी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले. https://maharashtramirror.com/ Pune News
पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पुणे शहर सचिव महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, ख्रिश्चन आघाडीचे पुणे शहर उपाध्यक्ष इशु दोरोस्वामी , शहर सचिव  स्टॅनली मेथन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. https://maharashtramirror.com/ Pune News
धर्मांतर विषयक नवीन कायदा २८  ऑगस्ट २०२६ पासून राज्यात लागू होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, या कायद्यांतर्गत खडकी पोलीस ठाण्यात १८ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा पक्षाने केला आहे. नवीन कायदा लागू होण्यापूर्वीच त्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने या प्रकरणाची पडताळणी करून संबंधित गुन्हा रद्द करावा, अन्यथा पुणे शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात येतील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. पक्षाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

शेअर करा