मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Rohit Pawar Tweet : रोहित पवार यांचा ट्विट, म्हातारा पैलवान कुस्ती खेळताना चा व्हिडिओ केला ट्विट

•दोन्ही राष्ट्रवादीच्या गटामध्ये वयाच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप केले जात आहे

V
Vivek

1 मिनिट वाचन

NCP Ajit Pawar Group Leader Amol Mitkari on Rohit Pawar

•दोन्ही राष्ट्रवादीच्या गटामध्ये वयाच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप केले जात आहे

पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर पवार कुटुंबामध्ये देखील दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. एकीकडे शरद पवार तर दुसरीकडे अजित पवार अशी स्थिती पवार कुटुंबाची झाली आहे. त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांची मुलगी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. त्यामुळे पवार कुटुंबातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. त्यातच अजित पवार यांनी शरद पवार यांचे वय झाले आहे, त्यांनी आता भजन, कीर्तन करावे अशी टीका केली होती. अजित पवार यांच्या टीकेला आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. Rohit Pawar Tweet

आमदार रोहित पवार यांचा ट्विट

वय नाही तर जिद्द महत्वाची असते, हेच व्हॉटसअपवर आलेल्या कुस्तीच्या या व्हिडिओतून दिसतं… म्हणूनच वयाकडं बोट दाखवून 'तुम्ही थांबत का नाही?' असा प्रश्न विचारायचा नसतो.. Rohit Pawar Tweet
पैलवान कधीच म्हातारा होत नसतो….राहिला प्रश्न भजनाचा, तर भजन हा व्यक्तिगत भक्तीचा विषय असल्याने कोणत्याही वयात भजन करता येतं. त्यामुळं भजनाला वयाशी जोडणं, हेही चुकीचं आहे.. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनी कोवळ्या वयात भक्ती आणि अध्यात्माचा पाया रचला हे कळणंही महत्त्वाचं असतं आणि ते कळायला अध्यात्मावर भक्ती आणि आस्था लागते.. Rohit Pawar Tweet

नेमके काय म्हणाले आमदार रोहित पवार

या संबंधी एक व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केला आहे. त्याबरोच त्यांनी अजित पवार यांच्यावर टीकाही केली आहे. ते म्हणाले की, 'वय नाही तर जिद्द महत्वाची असते, हेच व्हॉटसअपवर आलेल्या कुस्तीच्या या व्हिडिओतून दिसतं… म्हणूनच वयाकडं बोट दाखवून 'तुम्ही थांबत का नाही?' असा प्रश्न विचारायचा नसतो.. पैलवान कधीच म्हातारा होत नसतो.. राहिला प्रश्न भजनाचा, तर भजन हा व्यक्तिगत भक्तीचा विषय असल्याने कोणत्याही वयात भजन करता येतं. त्यामुळं भजनाला वयाशी जोडणं, हेही चुकीचं आहे.. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनी कोवळ्या वयात भक्ती आणि अध्यात्माचा पाया रचला हे कळणंही महत्त्वाचं असतं आणि ते कळायला अध्यात्मावर भक्ती आणि आस्था लागते.' Rohit Pawar Tweet

शेअर करा