मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Rohit Pawar : ‘नवी मुंबईतील जमीन घोटाळ्यात संजय शिरसाटांचा हात’; रोहित पवार यांचा गंभीर आरोप, अडचणीत वाढ

'सिडकोच्या अहवालात निर्णय चुकीचा’ असल्याचा स्पष्ट उल्लेख, रोहित पवारांनी कागदपत्रे वाचून दाखवली

V
Vivek

1 मिनिट वाचन

NCP Ajit Pawar Group Leader Amol Mitkari on Rohit Pawar

  • 'सिडकोच्या अहवालात निर्णय चुकीचा’ असल्याचा स्पष्ट उल्लेख, रोहित पवारांनी कागदपत्रे वाचून दाखवली
  • मुंबई :- ठाकरे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी आता दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आधी बेडरूममधील व्हिडीओ आणि आता नवी मुंबईतील एका मोठ्या जमीन घोटाळ्याप्रकरणी थेट रोहित पवार यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन शिरसाटांचा या घोटाळ्यात थेट सहभाग असल्याचा दावा केला असून, यासाठी त्यांनी सिडकोच्या अहवालाचा संदर्भही दिला आहे.

    रोहित पवार यांनी सिडकोचा अहवाल वाचून दाखवताना म्हटले की, “या प्रकरणात विधी आणि न्याय विभागाने घेतलेला निर्णय चुकीचा आहे, असा स्पष्ट उल्लेख खुद्द सिडकोच्या अहवालात आहे.” नवी मुंबईतील जमीन घोटाळ्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, ‘बिवलकर कुटुंबाने खरेदी केलेल्या जमिनीचे हे प्रकरण आहे. माझ्याकडे या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे आहेत, ज्यात विधी आणि न्याय विभागाने दिलेला रिपोर्टही आहे. त्यात स्पष्टपणे म्हटले आहे की, तुम्ही दिलेला रिपोर्ट चुकीचा आहे.’ हे आरोप असे वेळी झाले आहेत, जेव्हा संजय शिरसाट आधीच अनेक वादांमध्ये अडकले आहेत. त्यांच्या बेडरूममधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यात पैशांच्या बॅग दिसल्याचा आरोप झाला होता.

    याशिवाय, छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलच्या लिलावावरूनही त्यांच्यावर गंभीर आरोप झाले होते, ज्यात त्यांच्या मुलाचे नावही समोर आले होते. सध्याच्या या नव्या आरोपांमुळे संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून अधिक जोर धरण्याची शक्यता आहे. याआधीच्या आरोपांना संजय शिरसाट यांनी नेहमीच थेट उत्तर दिले आहे, त्यामुळे आता रोहित पवार यांच्या या नव्या आरोपांवर ते काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधक हे प्रकरण अधिक उचलून धरण्याची दाट शक्यता असून, आगामी काळात राज्यातील राजकारण या मुद्द्यावरून आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

    हेही वाचा: Mumbai Crime News : माटुंगा पोलिसांची कामगिरी : १२ लाखांची महिंद्रा थार चोरी करणारा आरोपी अटक

    शेअर करा