मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Rohit Pawar : प्रफुल्ल पटेलांच्या भेटीवर रोहित पवारांची सावध प्रतिक्रिया; म्हणाले, "शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करायला आले असतील तर…"

•रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतल्यावर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंवर आमदार रोहित पवारांचे स्पष्ट भाष्य; राजकीय चर्चांवरही दिले उत्तर

V
Vivek

1 मिनिट वाचन

Rohit Pawar : प्रफुल्ल पटेलांच्या भेटीवर रोहित पवारांची सावध प्रतिक्रिया; म्हणाले, "शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करायला आले असतील तर…"

•रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतल्यावर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंवर आमदार रोहित पवारांचे स्पष्ट भाष्य; राजकीय चर्चांवरही दिले उत्तर

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात उपचार घेत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधान आले असून, महायुतीमधील प्रवेशाच्या वाऱ्यांबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत. या संपूर्ण घडामोडींवर शरद पवार गटाचे युवा आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

"तब्येतीची विचारपूस करायला आल्यास गैर काय?" - रोहित पवार

माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी या भेटीवर फारसे राजकारण न करण्याचे संकेत दिले. ते म्हणाले की, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते रुग्णालयात आहेत. अशा वेळी जर कोणी राजकीय विरोधक किंवा इतर पक्षातील नेते त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात येत असतील, तर त्यात काही गैर नाही. माणुसकीच्या नात्याने साहेबांची भेट घेणे यात वेगळा कोणताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राजकीय तर्कवितर्कांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न

गेल्या काही दिवसांत राजकीय वर्तुळात घडत असलेल्या घडामोडींमुळे विविध चर्चांना उधाण आले असले, तरी ही भेट पूर्णपणे सदिच्छा भेट आणि प्रकृतीची चौकशी करण्यासाठीच होती, असे संकेत रोहित पवार यांच्या वक्तिवरून मिळाले आहेत. दरम्यान, शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते लवकरच पूर्णपणे बरे होऊन पुन्हा सक्रिय राजकारणात परततील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा: Tukaram Munde : दिवाळीत मिठाई खरेदी करताना तुकाराम मुंढेंचा कडक इशारा; भडक रंग आणि बनावट खवा ओळखण्याची 'ही' आहेत लक्षणे

शेअर करा