मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Rohit Pawar : मुंबईत पोलिसांवर हात! - कांदिवलीत गुंडांकडून पोलिसांना मारहाण; रोहित पवारांनी व्हिडिओ शेअर करत कायदा-सुव्यवस्थेवर उपस्थित केला प्रश्न

•एकता नगरमधील हाणामारी सोडवताना पोलिसांशी हुज्जत; वर्दीवर हात टाकण्याच्या घटनेने संताप; 'गुंडांची मस्ती जिरवावी' - रोहित पवार

V
Vivek

1 मिनिट वाचन

MLA Rohit Pawar ED

•एकता नगरमधील हाणामारी सोडवताना पोलिसांशी हुज्जत; वर्दीवर हात टाकण्याच्या घटनेने संताप; 'गुंडांची मस्ती जिरवावी' - रोहित पवार

मुंबई :- मुंबईतील कांदिवली परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकता नगर परिसरात दोन गटातील हाणामारी सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकाला काही स्थानिक गुंडांनी थेट मारहाण करत त्यांची कॉलर पकडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी हा व्हिडिओ 'एक्स' (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला आहे.

रोहित पवारांची थेट टीका

रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "निवडणुकीसाठी गुंडांचा वापर केल्यामुळं सरकारही आमचंच असल्याचा गुंडांचा समज झाला आहे आणि यातूनच थेट पोलिसांच्या वर्दीवर हात टाकण्यापर्यंत त्यांची डेअरिंग वाढू लागलीय."

पवार यांनी पुढे म्हटले, "पोलिसांना मारहाण करण्याचा कांदिवलीतील हा प्रकारही याच पठडीतला दिसतोय. अशा पद्धतीने पोलिसांचा वचक कमी होत गेला तर गल्लोगल्लीत गुंडांचा सुळसुळाट होऊन सामान्य माणसाला श्वास घेणंही कठीण होईल. या गुंडांची मस्ती जिरवण्याची धमक पोलिसांमध्ये आहे, पण त्यासाठी सरकारनेही पोलिसांना मोकळीक द्यावी. आम्ही पूर्णपणे महाराष्ट्र पोलिसांच्या पाठीशी आहोत."

नेमके काय घडले?

ही घटना कांदिवलीच्या एकता नगर परिसरात घडली.दोन गटात झालेल्या हाणामारीची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी दोन्ही गटांतील वाद सोडवण्याचा प्रयत्न करत असतानाच, तेथे जमलेल्या काही गुंडांनी थेट पोलिसांची कॉलर पकडत त्यांना मारहाण केली आणि हुज्जत घातली.
या घटनेवेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झालेली दिसत होती.

गुंडांकडून थेट पोलिसांना मारहाण झाल्यामुळे संताप व्यक्त होत असून, मुंबईसारख्या शहरात पोलिसांवरील वचक कमी होत असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा: Nitin Nabin : युवा नेतृत्वाचा उदय! - भाजपला मिळाला 45 वर्षीय सर्वात तरुण राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; बिहारचे नितीन नबीन यांच्यावर मोठी जबाबदारी

शेअर करा