मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Rohit Pawar : हाणामारी विधानभवनात… ठिय्या मध्यरात्री पोलीस ठाण्यात!

•"हातवारे करू नका… आमदाराला हात लावायचा नाही!" – मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात रोहित पवार भडकले

V
Vivek

1 मिनिट वाचन

MLA Rohit Pawar ED

•"हातवारे करू नका… आमदाराला हात लावायचा नाही!" – मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात रोहित पवार भडकले

मुंबई | महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राजकारण शाब्दिक पातळीवरून थेट हातघाईच्या वळणावर पोहोचले. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर रात्रीतून वातावरण चांगलेच तापले.

गुरुवारी झालेल्या हाणामारीनंतर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. याचदरम्यान आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला मध्यरात्री 12 वाजता विधानभवनातून अटक करण्यात आली. त्याचा निषेध करत आव्हाड व आमदार रोहित पवार यांनी पोलिसांच्या गाडीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं.

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक

पोलीस ठाण्यात झालेल्या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रोहित पवार यांनी पोलिसांवर थेट शब्दांचे बाण सोडले.“हातवारे करून बोलू नका, आवाज खाली करा. शहाणपण करू नका. आमदाराला हात लावायचा नाही,”असं स्पष्टपणे सांगताना रोहित पवार संतप्त स्वरात दिसून आले.याचवेळी कार्यकर्त्यांनीही पोलिसांवर दबाव टाकत "साहेबांना हात लावायचा नाही", असं जोरदार विरोध दर्शवला.

आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया – “फसवलं आम्हाला”

जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेच्या अध्यक्षांवर नाराजी व्यक्त करत म्हटलं:“अध्यक्षांनी आश्वासन दिलं होतं की नितीनला सोडणार. मात्र, त्यांनी शब्द फिरवला. जो कार्यकर्ता मार खातो त्याला पोलिस उचलतात, आणि गुन्हेगार पसार होतात – हा कुठला न्याय?”रोहित पवारांनीही पूर्ण पाठिंबा जाहीर करत कार्यकर्त्यांच्या बाजूने ठाम भूमिका घेतली.

शेअर करा