मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Rohit Pawar : अजित पवार अपघात प्रकरण: "त्या दोषींना आम्ही सोडणार नाही!", रोहित पवारांचा कडाडून हल्ला; विमान कंपनीच्या मालकाला बड्या नेत्यांचे संरक्षण असल्याचा आरोप

•जय पवारांच्या व्हिडिओनंतर रोहित पवार मैदानात | 'VSR' कंपनीच्या मालकाचे दिल्लीतील नेत्यांशी संबंध असल्याचा दावा | DGCA च्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

V
Vivek

2 मिनिट वाचन

Rohit Pawar : अजित पवार अपघात प्रकरण: "त्या दोषींना आम्ही सोडणार नाही!", रोहित पवारांचा कडाडून हल्ला; विमान कंपनीच्या मालकाला बड्या नेत्यांचे संरक्षण असल्याचा आरोप

•जय पवारांच्या व्हिडिओनंतर रोहित पवार मैदानात | 'VSR' कंपनीच्या मालकाचे दिल्लीतील नेत्यांशी संबंध असल्याचा दावा | DGCA च्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

मुंबई :- महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 28 जानेवारीला झालेल्या अपघाती निधनानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. हा अपघात नसून 'घातपात' असल्याचा संशय आता अधिक गडद झाला आहे. अजित पवारांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी आज एक व्हिडिओ शेअर करत, या प्रकरणातील दोषींना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या बड्या नेत्यांना सोडणार नाही, असा इशारा दिला आहे.

नेमका आरोप काय?

अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनी 'व्हीएसआर' (VSR) कंपनीचा मालक रोहित सिंग विमान उड्डाणादरम्यान झोपल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. तोच व्हिडिओ पुन्हा शेअर करत रोहित पवार यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत:

राजकीय वरदहस्त: "हा रोहित सिंग राज्यातील मोठ्या नेत्यांपेक्षाही मोठा झाला आहे का? याच्या लग्नाला केंद्रातील मंत्री आणि राज्यातील सत्ताधारी नेते उपस्थित होते, म्हणूनच त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत," असा थेट आरोप रोहित पवारांनी केला आहे.

DGCA वर अविश्वास: विमान वाहतूक महासंचालनालयाची (DGCA) आतापर्यंतची सुस्त हालचाल पाहता, त्यांच्याकडून न्याय मिळेल की नाही याबाबत रोहित पवारांनी शंका व्यक्त केली आहे.

अपघातापासून 'सुसाईड बॉम्बर'च्या दाव्यापर्यंत

अजित पवार बारामतीला जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना विमानाचे क्रॅश लँडिंग झाले होते. या घटनेनंतर अमोल मिटकरी यांनी वैमानिक कॅप्टन सुमित कपूर हा 'सुसाईड बॉम्बर' तर नव्हता ना? अशी शंका उपस्थित केली होती. आता खुद्द मालकाचाच झोपलेला व्हिडिओ समोर आल्याने हा निष्काळजीपणा आहे की कट, या चर्चेने जोर धरला आहे.

"जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही"; आमदार रोहित पवार

रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, हाच तो VSR कंपनीचा मालक रोहित सिंग… आज तो जणूकाय राज्यातील सगळ्याच मोठ्या नेत्यांपेक्षाही मोठा झालाय आणि याच्याच लग्नाला केंद्रातील मंत्रीपदावरील आणि राज्यातील सत्तेतील बडे नेते गेले होते… म्हणूनच त्याला वाचवण्याचा सगळीकडूनच प्रयत्न होताना दिसतोय.. विमान हवेत असताना स्वतः पायलट असूनही झोप काढतानाचा त्याचा माझे बंधू जय पवार यांनी शेअर केलेला हाच तो व्हिडिओ..!

DGCA ची आजपर्यंतची संपूर्ण हालचाल बघता त्यांच्याकडून यावर कारवाई होईल की नाही, याबाबत आमच्या मनात शंका आहे. पण अजितदादांच्या विमान अपघाताला जबाबदार असलेल्यांना मात्र आम्ही कदापि सो..ड…णा….र….. नाही.

हेही वाचा: Holi : उत्सव रंगांचा, बंधुभाव जपण्याचा! देशभरात होळीचा उत्साह; सण साजरा करताना पर्यावरणाचे भान राखण्याचे आवाहन

शेअर करा