मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Rohini Khadse शिशेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्या घरावर दगड फेकू नयेत!" – रोहिणी खडसेंचा फडणवीसांना टोला

Rohini Khadse : आणीबाणीच्या 50 वर्षांनिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांचा लेख चर्चेत; शरद पवार गटाच्या महिला नेत्या रोहिणी खडसेंची भाजपवर परखड टीका

V
Vivek

1 मिनिट वाचन

Rohini Khadse शिशेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्या घरावर दगड फेकू नयेत!" – रोहिणी खडसेंचा फडणवीसांना टोला

Rohini Khadse : आणीबाणीच्या 50 वर्षांनिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांचा लेख चर्चेत; शरद पवार गटाच्या महिला नेत्या रोहिणी खडसेंची भाजपवर परखड टीका

मुंबई | 25 जून 1975 — देशाच्या लोकशाही इतिहासातील काळाकुट्ट दिवस. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या दिवशी आणीबाणी जाहीर करत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध घातले. त्या घटनेला आज पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांनी एका अग्रलेखातून आणीबाणीचा निषेध करत काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. मात्र त्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी फडणवीसांच्या लेखावर निशाणा साधताना, "ज्यांच्या स्वतःच्या घराचे भिंती काचांच्या आहेत, त्यांनी इतरांच्या घरावर दगड फेकू नयेत," अशा शब्दांत थेट टोला लगावला आहे.

खडसे यांनी फडणवीसांचा लेख सोशल मीडियावर शेअर करत भाजपवर सवालांची सरबत्ती केली. त्या म्हणाल्या, “1975 मध्ये आणीबाणी लादली, हे खरेच. पण आजची परिस्थिती यापेक्षा वेगळी आहे का? आज माध्यमं, निवडणूक आयोग, स्वायत्त संस्था खरंच स्वतंत्र आहेत का? सत्तेवर असलेल्या पक्षाने स्वतःच काळा इतिहास असताना इतरांवर टीका करावी, हे शोभत नाही.”

"आज काहींनी वर्तमानपत्रांमधून आणीबाणीवर रकाने भरून लिहिले आहेत. पण देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, न्यायसंस्था आणि माध्यम स्वातंत्र्याचं काय झालं आहे, हे ही पाहायला हवं," असं सांगत खडसेंनी भाजपवर सवाल उभे केले.

आणीबाणीच्या 50 वर्षानंतरही ही घटना राजकीय कुरघोड्यांचा विषय बनताना दिसत आहे. एकीकडे भाजप काँग्रेसच्या त्या निर्णयावर टीका करत आहे, तर दुसरीकडे विरोधक सध्याच्या सरकारवर लोकशाहीचा गळा घोटण्याचे आरोप करत आहेत. त्यामुळे आजचा दिवस पुन्हा एकदा राजकीय घमासानाचा साक्षीदार ठरतो आहे.

शेअर करा