मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ritu Tawde : दिया मिर्झाच्या पालिकेतील जनजागृती मोहिमेवरून नवा वाद; मुंबईच्या महापौर रितू तावडे आक्रमक, दिलं 'ब्लॅकलिस्ट' करण्याचं वक्तव्य

•Ritu Tawde On Diya Mirza : आमदार अमित साटम यांच्यानंतर महापौर रितू तावडे यांचा बीएमसी प्रशासनावर आणि दिया मिर्झावर तीव्र संताप; हिंदू सणांच्या बाबत सिलेक्टिव्ह अजेंडा चालवत असल्याचा केला गंभीर आरोप

V
Vivek

2 मिनिट वाचन

Ritu Tawde : दिया मिर्झाच्या पालिकेतील जनजागृती मोहिमेवरून नवा वाद; मुंबईच्या महापौर रितू तावडे आक्रमक, दिलं 'ब्लॅकलिस्ट' करण्याचं वक्तव्य

•Ritu Tawde On Diya Mirza : आमदार अमित साटम यांच्यानंतर महापौर रितू तावडे यांचा बीएमसी प्रशासनावर आणि दिया मिर्झावर तीव्र संताप; हिंदू सणांच्या बाबत सिलेक्टिव्ह अजेंडा चालवत असल्याचा केला गंभीर आरोप

मुंबई :- महानगरपालिकेच्या पर्यावरणपूरक दिवाळी जनजागृती मोहिमेअंतर्गत अभिनेत्री दिया मिर्झाचा व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर सुरू झालेला वाद आता अधिकच तापला आहे. भाजप आमदार अमित साटम यांनी घेतलेल्या तीव्र आक्षेपानंतर महापालिकेने हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावरून हटवला होता. त्यानंतर आता मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही या प्रकरणात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. "आम्हाला दिया मिर्झासारख्या लोकांकडून आमचे सण आणि दिवाळी कशी साजरी करायची हे शिकण्याची बिलकूल गरज नाही," अशा अत्यंत कठोर शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

"दिया मिर्झाचा सिलेक्टिव्ह अजेंडा आणि देशविरोधी शक्तींना पाठिंबा"

प्रसारमाध्यमांशी बोलताना महापौर रितू तावडे यांनी दिया मिर्झावर अत्यंत गंभीर आरोप केले. दिया मिर्झा कायमच आपल्या पोस्टच्या माध्यमातून हिंदू संस्कृतीला लक्ष्य करतात आणि देशात अराजकता पसरवणाऱ्या शक्तींशी हातमिळवणी करून काम करतात, असा घणाघात त्यांनी केला. नर्मदा बचाव आंदोलनातील त्यांची भूमिका, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकास धोरणांना विरोध आणि लक्झरी कार किंवा खाजगी विमानाने प्रवास करताना कार्बन फूटप्रिंटचा विसर पडणे, या गोष्टींचा दाखला देत रितू तावडे यांनी दिया मिर्झावर 'सिलेक्टिव्ह अजेंडा' चालवत असल्याचा आणि हिंदू विरोधी भूमिका मांडत असल्याचा घणाघाती आरोप केला.

दिया मिर्झाला 'ब्लॅकलिस्ट' करण्याची मागणी आणि पालिकेला जाब

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बीएमसी प्रशासनाकडून सेलिब्रिटींचे व्हिडिओ तयार करून जनजागृती केली जात असली, तरी जनजागृती करणाऱ्या कलाकारांची यादी महापौरांच्या मंजुरीसाठी सादर का केली गेली नाही, असा थेट जाब रितू तावडे यांनी प्रशासनाला विचारला आहे. "जर ही यादी माझ्या टेबलवर आली असती, तर दिया मिर्झाचे नाव आम्ही आधीच हटवले असते," असे सांगत महापौरांनी महायुती सरकारच्या काळात दिया मिर्झाला 100 टक्के 'ब्लॅकलिस्ट' (काळ्या यादीत) करण्यात आले आहे, असे स्पष्ट केले. तसेच, या प्रकरणावरून प्रशासनाच्या जनसंपर्क विभागाकडून उत्तर मागवले जाणार असून हिंदू सणांची बदनामी करणाऱ्यांना महायुती म्हणून यापुढेही तीव्र विरोध केला जाईल, असा सडेतोड इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा: Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती बिघडली; पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल

शेअर करा