मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

CM Eknath Shinde : "निर्धार ग्रामीण विकास" माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्धार ग्रामीण विकासाच्या पुस्तकाचे प्रकाशन

V
Vivek

1 मिनिट वाचन

CM Eknath Shinde : Release of "Nirdhar Rural Development" information booklet by Chief Minister Eknath Shinde

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्धार ग्रामीण विकासाच्या पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई :- सरकारचा पावसाळी अधिवेशनाचा Maharashtra Monsson Session आजचा शेवटचा दिवस होता. या अधिवेशनाच्या निमित्ताने शासनाच्या योजन सर्वसामान्य पर्यंत पोहोचावे याकरिता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून विविध उपयोजना केले जातात. बहुचर्चित मुख्यमंत्री लाडली बहिण योजना प्रत्येक घरात पोहोचावे यासाठी शिंदे सरकारने कंबर कसली आहे. दोन ते तीन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तत्पूर्वी सरकारच्या योजना आणि सरकारने केलेली कामगिरी सर्वसामान्य जनतेपर्यंत जास्त कडून ग्रामीण भागात पोहोचावे याकरिता शिंदे सरकारकडून विविध योजनांचे पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले आहे.

'निर्धार ग्रामीण विकासाचा' माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विधानभवनात प्रकाशन करण्यात आले. गावातील प्रत्येक व्यक्तीचे जीवनमान उंचावण्यासाठी ग्रामविकास विभाग काम करीत आहे. ग्रामीण आवास योजना ते महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राबविण्यात येणारे 'उमेद' अभियान यासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना ग्रामविकास विभाग ग्रामविकास मंत्री यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे राबवित आहे. ग्रामीण जनतेच्या जीवनमानाशी संबंधित असलेल्या विविध योजना ग्रामविकास विभाग राबवितो. या योजनांची माहिती असलेली 'निर्धार ग्रामीण विकासाचा' ही पुस्तिका सर्वांना उपयुक्त आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुस्तिकेच्या प्रकाशनप्रसंगी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, कामगारमंत्री सुरेश खाडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते.

शेअर करा