मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : महागाई अन् जागतिक अस्थिरतेचा दणका; चार वर्षांनंतर आरबीआयने वाढवला रेपो रेट, गृह आणि वाहन कर्जाचे 'ईएमआय' वाढणार!'

Mumbai News : मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून जागतिक पातळीवर निर्माण झालेली राजकीय व आर्थिक अस्थिरता, सतत वाढणारी महागाई आणि भारतीय भांडवली बाजारात (शेअर मार्केट) सुरू असलेली मोठी पडझड या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

महागाई अन् जागतिक अस्थिरतेचा दणका; चार वर्षांनंतर आरबीआयने वाढवला रेपो रेट, गृह आणि वाहन कर्जाचे 'ईएमआय' वाढणार!'
महागाई अन् जागतिक अस्थिरतेचा दणका; चार वर्षांनंतर आरबीआयने वाढवला रेपो रेट, गृह आणि वाहन कर्जाचे 'ईएमआय' वाढणार!'

Mumbai News : आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची 25 बेसिस पॉईंट्स वाढीची घोषणा; रेपो रेट 5.50 टक्क्यांवर पोहोचला'

Mumbai News : मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून जागतिक पातळीवर निर्माण झालेली राजकीय व आर्थिक अस्थिरता, सतत वाढणारी महागाई आणि भारतीय भांडवली बाजारात (शेअर मार्केट) सुरू असलेली मोठी पडझड या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बुधवारी पतधोरण समितीच्या (MPC) द्वैमासिक बैठकीनंतर 'रेपो रेट'मध्ये (Repo Rate) थेट 25 बेसिस पॉईंटची (0.25 टक्के) वाढ करत असल्याची अधिकृत घोषणा केली.या वाढीमुळे रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट आता 5.25 टक्क्यांवरून 5.50 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या चार वर्षांमध्ये आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ करण्याची ही पहिलीच वेळ असून, या निर्णयाचा थेट आणि मोठा फटका सर्वसामान्य कर्जदारांना बसणार आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News

'गृहकर्ज, वाहन कर्ज अन् पर्सनल लोन महागणार; ईएमआय वाढण्याची शक्यता'

रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवल्यामुळे आता व्यावसायिक आणि राष्ट्रीयीकृत बँकांना आरबीआयकडून मिळणारे कर्ज महाग झाले आहे. परिणामी, बँकांकडून लवकरच गृहकर्ज (Home Loan), वाहन कर्ज (Auto Loan) आणि वैयक्तिक कर्जाच्या (Personal Loan) व्याजदरात मोठी वाढ केली जाण्याची शक्यता आहे.ज्या नागरिकांनी आधीच फ्लोटिंग व्याजदरावर गृहकर्ज किंवा इतर कर्जे घेतली आहेत, त्यांच्या मासिक हप्त्यांमध्ये (EMI) वाढ होणार असून नव्या कर्जदारांनाही आता अधिक व्याजाने कर्ज घ्यावे लागणार आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News

'फेब्रुवारी 2025 नंतरचे धोरण बदलले; चार वर्षांनंतर पहिलाच झटका'

आरबीआयच्या या निर्णयाचे बहुतांश अर्थतज्ज्ञांनी आधीच अंदाज वर्तवले होते. यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये आरबीआयने रेपो रेट 6.50 टक्के केला होता, जो 2023-24 या आर्थिक वर्षात स्थिर राहिला. त्यानंतर फेब्रुवारी 2025 पासून आरबीआयने नरमाईचे धोरण स्वीकारत रेपो रेट सातत्याने कमी करत तो 5.25 टक्क्यांपर्यंत खाली आणला होता. मात्र, महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँकेला अखेर चार वर्षांनंतर पुन्हा एकदा रेपो रेट वाढवण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा