मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News: विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी योगदान द्यावे

Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील ‘विकसित महाराष्ट्र’ घडवण्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपले योगदान द्यावे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

‘विकसित महाराष्ट्र’ घडवण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी योगदान द्यावे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन
‘विकसित महाराष्ट्र’ घडवण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी योगदान द्यावे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

Pune News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील ‘विकसित महाराष्ट्र’ घडवण्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपले योगदान द्यावे. जास्तीत जास्त वेळ पक्षकार्यासाठी देत पूर्ण क्रियाशीलतेने काम करण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. सोमवारी (दि.३१) पुण्यातील गणेश कला क्रीडा मंडळात आयोजित भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य मंत्रिमंडळातील पक्षाचे मंत्री, प्रदेश पदाधिकारी आणि राज्यभरातून आलेले ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. https://maharashtramirror.com/ Pune News

रवींद्र चव्हाण म्हणाले , पक्षाने राज्यभरात कार्यकर्त्यांच्या क्षमता विकासासाठी व्यापक प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजना आणि उपलब्धी तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी नव्याने वक्त्यांची फळी तयार करण्यावर भर दिला जात आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या खंबीर नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टांमुळेच पक्षाला सर्व निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळाले आहे. राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींपैकी सुमारे ८ ते १० हजार ग्रामपंचायतींवर भाजपचे सरपंच आहेत. राष्ट्रीयत्वाचा विचार घेऊन चालणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये ही मोठी ताकद असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.https://maharashtramirror.com/ Pune News

युवापिढीला नशामुक्त करण्याचे आव्हान

महाराष्ट्रातील तरुण पिढीला नशेच्या आहारी जाण्यापासून रोखण्यासाठी पक्षाने या कार्यकारिणीच्या माध्यमातून ठोस पावले उचलली, तर महाराष्ट्र भाजप कार्यकर्त्यांचे हे योगदान कायमस्वरूपी लक्षात ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.https://maharashtramirror.com/ Pune News

प्रत्येक बूथवर जबाबदारी

राज्यातील १ लाख ५६ हजार बूथवर सक्षम कार्यकर्ते तयार केले पाहिजेत आणि प्रत्येक कार्यकर्त्यावर विशिष्ट जबाबदारी सोपवली पाहिजे. आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा परिषद व महापालिका सदस्य तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्यापासून ते बूथ स्तरावरील सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांचा पक्षकार्यात थेट सहभाग असायला हवा असेही यावेळी रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

शेअर करा