मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ramtekadi Murder | दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून रामटेकडी येथे तरुणाचा दगडाने ठेचून खून

वानवडी पोलिसांकडून आरोपी तात्काळ ताब्यात अल्पवयीन गुन्हेगारांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी ?

M
mubarak

1 मिनिट वाचन

raju shirish shivsharan murder

  • वानवडी पोलिसांकडून आरोपी तात्काळ ताब्यात
  • अल्पवयीन गुन्हेगारांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी ?
  • पुणे, दि. ९ ऑगस्ट, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Ramtekadi murder

    पुणे शहरात दिवसेंदिवस घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी थैमान घातला आहे. आज दि. ९ रात्री उशिरा रामटेकडी येथे टोळक्याने दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून एका तरुणाचा सिमेंट ब्लॉक, दगडाने ठेचून खून केला. (ramtekadi murder) खुनाची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

    खुन झाल्याचे कळताच रामटेकडी हडपसर परिसरात दहशत पसरली आहे. अल्पवयीन गुन्हेगारांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी राजू शिवशरण यांच्या नातेवाईकांनी केली असून गुन्हे दाखल न झाल्यास वानवडी (wanwadi police station) पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार असल्याचे सूत्रांकडून समजते. (pune breaking news)

    राजू शिवशरण

    राजू शिरीष शिवशरण, अंदाजे वय ३५ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. राजू शिवशरण (Raju Shivsharan) हा देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजते. राजू शिवशरण व आरोपी यांच्यात पूर्ववैमनस्य असल्याचे देखील माहिती समोर येत आहे.

    रात्री राजू शिवशरण रामटेकडी वंदेमातरम चौक येथून जात असताना अल्पवयीन आरोपींनी शिवशरण यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले परंतु राजू यांनी पैसे न दिल्याने अल्पवयीन गुन्हेगारांनी सिमेंट ब्लॉक, दगडाने शिवशरण यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्याचा खून केला.

    हेही वाचा: Neeraj Chopra: पॅरिस ऑलिम्पिक रौप्यपदकासाठी पंतप्रधान मोदींनी नीरज चोप्राचे अभिनंदन केले

    शेअर करा