मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ramtekadi Murder | अल्पवयीन मुलाने खून केला आता 'आई' भोगणार जेल : रामटेकडी खून प्रकरणात अल्पवयीन गुन्हेगाराच्या आईवर गुन्हा

बाल गुन्हेगारांना रोखण्यासाठी कडक कारवाई : वपोनि संजय पतंगे वानवडी पोलिसांकडून आरोपी ५ अल्पवयीन तात्काळ ताब्यात अल्पवयीन गुन्हेगारांच्या आईवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ

M
mubarak

2 मिनिट वाचन

ramtekadi murder

  • बाल गुन्हेगारांना रोखण्यासाठी कडक कारवाई : वपोनि संजय पतंगे
  • वानवडी पोलिसांकडून आरोपी ५ अल्पवयीन तात्काळ ताब्यात
  • अल्पवयीन गुन्हेगारांच्या आईवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ
  • पुणे, दि. १० ऑगस्ट, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Ramtekadi Murder

    पुणे शहरात दिवसेंदिवस घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी थैमान घातला आहे. यात अल्पवयीन गुन्हेगारांचा सहभाग चिंतेचा विषय ठरत आहे. अल्पवयीन गुन्हेगारांना रोखण्यासाठी आता पुणे पोलिसांनी (Pune Police) थेट पालकांवर गुन्हा दाखल करण्याचे धोरण हाती घेतल्याने खळबळ उडाली आहे. दि. ९ रात्री उशिरा रामटेकडी येथे टोळक्याने दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून एका तरुणाचा सिमेंट ब्लॉक, दगडाने ठेचून खून केला होता, यात अल्पवयीन गुन्हेगारांना ताब्यात घेतल्यानंतर थेट गुन्हेगाराच्या आईवर गुन्हा नोंद करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. Ramtekadi Murder

    वानवडी पोलीस ठाण्याचे वपोनि संजय पतंगे यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत टोळक्यातील सर्व ५ अल्पवयीन आरोपींना तात्काळ ताब्यात घेतले. यामध्ये एका अल्पवयीन गुन्हेगाराच्या आईवर गुन्हा दाखल करत यापुढे कोणी अल्पवयीन गुन्हेगाराने कायदा हातात घेतल्यास त्याच्या पालकांना याचे परिणाम भोगावे लागतील असा संदेश दिला आहे. Ramtekadi Murder

    छायाचित्रे · 1/1

    Arrow Keys ⟵ ⟶
    raju shirish shivsharan
    Raju Shivsharan

    मयत राजू शिवशरण (Raju Shivsharan) रामटेकडी वंदेमातरम चौक येथून जात असताना अल्पवयीन आरोपींनी शिवशरण यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले परंतु राजू यांनी पैसे न दिल्याने अल्पवयीन गुन्हेगारांनी सिमेंट ब्लॉक, दगडाने शिवशरण यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्याचा खून केला होता. Ramtekadi Murder

    खुन झाल्याचे कळताच रामटेकडी हडपसर परिसरात दहशत पसरली आहे. अल्पवयीन गुन्हेगारांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी राजू शिवशरण यांच्या नातेवाईकांनी केल्याने वानवडी पोलीस ठाणे वपोनि संजय पतंगे यांनी थेट अल्पवयीन गुन्हेगारांच्या आईवर गुन्हा दाखल करत बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.

    सदरची कारवाई ही मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर Pune Police, आर राजा, पोलीस उप-आयुक्त सोो, परिमंडळ ०५ पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर व संजय पतंगे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पो. स्टे. पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक, संजय आदलिंग, व पोलीस अंमलदार अतुल गायकवाड, महेश गाढवे, सर्फराज देशमुख, दाऊद सय्यद, संदीप साळवे, अमोल गायकवाड, विष्णु सुतार, यतीन भोसले, सोमनाथ कांबळे, गोपाल मदने, अमोल पिलाणे या विशेष पथकाने केली आहे.

    हेही वाचा: Beed News : बीडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा निषेध, ताफ्यावर टोमॅटो आणि सुपारी फेकली

    हेही वाचा: CSMT Bomb Threat : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस RDX उडवून देण्याची धमकी, आरोपी ताब्यात

    शेअर करा