मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ramgiri Maharaj Statement : मी माफी मागणार नाही, माझा इस्लामवर विश्वास…..', प्रेषित मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह विधान करणारे रामगिरी महाराज आता काय म्हणाले?

Ramgiri Maharaj on Prophet Mohammad: रामगिरी महाराज म्हणाले की, प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे आणि तो संविधानाने दिला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ramgiri Maharaj Statement : मी माफी मागणार नाही, माझा इस्लामवर विश्वास…..', प्रेषित मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह विधान करणारे रामगिरी महाराज आता काय म्हणाले?

Ramgiri Maharaj on Prophet Mohammad: रामगिरी महाराज म्हणाले की, प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे आणि तो संविधानाने दिला आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर तो त्याचा वैयक्तिक मुद्दा आहे.

मुंबई :- प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त Prophet Mohammad विधान करणारे महाराष्ट्रातील सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज Ramgiri Maharaj पुन्हा एकदा चर्चेत आले प्रेषित मोहम्मद आणि इस्लाम यांच्यावर कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या मुद्द्यावर रामगिरी महाराज यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे.ते म्हणाले की, ते इस्लामविरोधी नाहीत, मात्र त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागणार नाही आहेत.

रामगिरी महाराज यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले की, "मी माफी मागणार नाही. या प्रकरणी न्यायालय जो काही निर्णय देईल, तो मला मान्य असेल. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे आणि हा अधिकार घटनेने दिलेला आहे.ते म्हणाले की, त्यांच्या वक्तव्यानंतर देशाबाहेरील सोशल मीडिया वापरकर्ते देशात हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.

रामगिरी महाराज यांच्यासोबत मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह हेही उपस्थित होते. सत्यपाल सिंह म्हणाले, "महंत रामगिरी माफी मागणार नाहीत, कारण त्यांनी इस्लामिक पुस्तकांमध्ये काय लिहिले आहे ते सांगितले. इस्लामच्या विद्वानांनी आणि मौलानानी सर्वांना सांगावे की रामगिरीच्या वक्तव्यात तथ्य नव्हते का?"

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांचाळे गावात रामगिरी महाराजांवर प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप झाला होता. हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरात तणाव वाढला होता.याबाबत मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली आणि एफआयआरही नोंदवण्यात आला.

शेअर करा