मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ram Mandir Trust ayodhya News : राम मंदिर ट्रस्टला मिळणार पहिला CEO; तीन नावांमध्ये रंगली चुरस

Ram Mandir Trust ayodhya News : अयोध्या : अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या प्रशासकीय व्यवस्थेला आता नवा चेहरा मिळणार आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

राम मंदिर ट्रस्टला मिळणार पहिला CEO; तीन नावांमध्ये रंगली चुरस
राम मंदिर ट्रस्टला मिळणार पहिला CEO; तीन नावांमध्ये रंगली चुरस

Ram Mandir Trust ayodhya News : अयोध्या : अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या प्रशासकीय व्यवस्थेला आता नवा चेहरा मिळणार आहे. ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदासाठी सुरू असलेली निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, आज होणाऱ्या बैठकीत पहिल्या CEOच्या नावावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. या पदासाठी निवड समितीने तीन नावांची शिफारस केली आहे.https://maharashtramirror.com/ Ram Mandir Trust ayodhya News

निवड समितीने मंगळवारी ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांच्याकडे आपला अंतिम अहवाल सादर केला. माजी आयपीएस अधिकारी राजेश पांडे, बिहारचे माजी डीजीपी डॉ. परेश सक्सेना आणि आयएएस अधिकारी दिनेश चंद्र या तिघांची अंतिम यादीत निवड करण्यात आली आहे. आज दुपारी ट्रस्टच्या बैठकीत या तिन्ही नावांवर चर्चा होऊन एका नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.https://maharashtramirror.com/ Ram Mandir Trust ayodhya News

५,५८५ अर्जांची छाननी

मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाले होते. एकूण ५,५८५ अर्ज आल्यानंतर पात्रता, प्रशासकीय अनुभव, कार्यक्षमता आणि अन्य निकषांच्या आधारे अर्जांची छाननी करण्यात आली. निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी सुमारे ६०० गुणांचे मूल्यांकन निकष तयार करण्यात आले होते. https://maharashtramirror.com/ Ram Mandir Trust ayodhya News

छाननीनंतर ४७० किंवा त्याहून अधिक गुण मिळविणाऱ्या १०८ उमेदवारांची पुढील टप्प्यासाठी निवड करण्यात आली. त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उमेदवारांशी चर्चा करण्यात आली. पुढील प्रक्रियेत १७ उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्यात आली. त्यापैकी एका उमेदवाराला अयोध्येत होणाऱ्या अंतिम प्रक्रियेला उपस्थित राहता आले नाही.https://maharashtramirror.com/ Ram Mandir Trust ayodhya News

चार दिवसांच्या प्रक्रियेनंतर तीन नावे निश्चित

CEO पदासाठी स्थापन करण्यात आलेल्या तीन सदस्यीय निवड समितीने चार दिवस सखोल प्रक्रिया राबवली. निवृत्त न्यायाधीश प्रमोद कोहली यांच्या अध्यक्षतेखालील समितीत निवृत्त लेफ्टनंट जनरल विष्णूकांत चतुर्वेदी आणि माजी शास्त्रज्ञ सुरेश हावडे यांचा समावेश होता. पात्रता, अनुभव तसेच प्रशासकीय क्षमता या विविध बाबींचा विचार करून अखेर तीन उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली.https://maharashtramirror.com/ Ram Mandir Trust ayodhya News

दरम्यान, आजच्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज, युगपुरुष परमानंद आणि शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती अयोध्येत दाखल झाले आहेत. ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास, अंतरिम सरचिटणीस डॉ. कृष्ण मोहन आणि विश्वस्त महंत दिनेंद्र दास बैठकीला उपस्थित राहणार आहेत. स्वामी विश्व प्रसन्न तीर्थ आणि केशव पाराशरण हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी होणार आहेत.https://maharashtramirror.com/ Ram Mandir Trust ayodhya News

राम मंदिराच्या उभारणीनंतर मंदिर परिसरातील वाढती प्रशासकीय जबाबदारी, भाविकांची वाढती संख्या आणि विविध व्यवस्थापनाशी संबंधित कामकाज पाहण्यासाठी CEOची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे आज कोणाच्या नावावर अंतिम निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा