मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Raj Thackeray : दादरमधील कबुतरखान्यावरून राज ठाकरे आक्रमक

•'जैन समाजालाही न्यायालयाचा निर्णय मानावा लागेल'; मंत्री लोढांवरही निशाणा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Raj Thackeray : दादरमधील कबुतरखान्यावरून राज ठाकरे आक्रमक

•'जैन समाजालाही न्यायालयाचा निर्णय मानावा लागेल'; मंत्री लोढांवरही निशाणा

मुंबई :- मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दादरमधील प्रसिद्ध कबुतरखाना बंद करण्यात आल्यामुळे निर्माण झालेल्या वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक असून, जैन समाजालाही कबुतरांमुळे होणाऱ्या रोगांचा विचार करायला हवा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज ठाकरे म्हणाले की, "कबुतरांमुळे कोणते रोग होतात, हे समजून घेणे आवश्यक आहे. न्यायालयाने कबुतरांना खायला घालू नये असा आदेश दिला आहे. त्यामुळे जो कोणी हा नियम मोडेल, त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करायलाच हवी." दादरमध्ये जैन समाजाने केलेल्या आंदोलनावरही त्यांनी टीका करत, आंदोलकांवर कारवाई व्हायला पाहिजे होती, असे मत व्यक्त केले.

या प्रकरणात राज्याचे पर्यटन आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या मध्यस्थीवरही राज ठाकरे यांनी निशाणा साधला. "लोढा-बिढा सारखे लोकं सारखे मध्ये येतात. मंगलप्रभात लोढा काही एका समाजाचे मंत्री नाहीत, ते राज्याचे मंत्री आहेत. त्यांनीही न्यायालयाचा निर्णय मानला पाहिजे," असे सांगत त्यांनी लोढा यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

दरम्यान, जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी राज ठाकरे यांना मराठी-मारवाडी वाद मिटवण्यासाठी साद घातली आहे. "तुम्हाला मराठी हिंदुहृदयसम्राट म्हणतात. तुम्ही मराठी-मारवाडी वाद मिटवा. आम्ही मारवाडी लोक तुमच्यासोबत आहोत. जो कोणी मराठी भाषेचा अपमान करेल, त्याच्याविरोधात तुम्ही भूमिका घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत," असे सांगून त्यांनी मराठी लोकांची माफीही मागितली.

हेही वाचा: Shiv Sena symbol and name dispute: शिवसेना वादाचा अंतिम फैसला लांबणीवर; आता 8 ऑक्टोबरला सुनावणीची शक्यता

शेअर करा